Lumina
Zechariah

Joshua the High Priest

Zechariah 3·Marathi Bible

1यहोशवा देवदूतापुढे उभा होता. त्याने मळकी वस्त्रे घातली होती.

2मग जवळ उभ्या असलेल्या इतर देवदूतांना हा देवदूत म्हणाला, “यहोशवाची मळकी वस्त्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत योशीयाशी बोलला. तो म्हणाला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि वस्त्रबदल म्हणून तुला नवीन वस्त्रे देत आहे.”

3मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला. परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्याला स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.

4मग परमेश्वराच्या दूताने यहोशवाला पुढील गोष्टी सांगितल्या:

5सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग. मी सांगितलेल्या गोष्टी कर. मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील. मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील. येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.

Zechariah 3 illustration - Zechariah Chapter 3

6तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.

7पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो. त्याला सात बाजूआहेत. मी त्यावर खास संदेश कोरीन. तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरीलसर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”

8सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक आपल्या मित्रांबरोबर व शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील. ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”

9मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.

10मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिवआहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.

Chapter Complete

You have read Zechariah 3

10 verses