Lumina
Zechariah

Cleansing the People

Zechariah 13·Marathi Bible

1एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे स्वत:चे आई - वडील त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आई - वडील त्याला भोसकतील.

2त्यावेळी संदेष्ट्यांना स्वत:च्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल. ज्यावरुन संदेष्टा ओळखाला जातो असे सणाचे कापड ते वापरणार नाहीत. भविष्याच्या नावाखाली खोटेनाटे सांगून लोकांना फसविण्यासाठी ते असे कपडे घालणार नाहीत.

3‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय.’ असे ते सांगतील.

4पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला मार देण्यात आला!”‘

5सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, मेंढपाळांवर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढ्या पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.

Zechariah 13 illustration - Zechariah Chapter 13

6त्या प्रदेशातील 2 3 लोक जखमी होऊन मरतील. पण 1 3 वाचतील

7मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘

8पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल.

9यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे - अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही.

Chapter Complete

You have read Zechariah 13

9 verses