Lumina
SongofSolomon

The Bride's Beauty

SongofSolomon 4·Marathi Bible

1तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.

2तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक आणि लांब आहे. त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली सैनिकांच्या एक हजार ढालींनी शोभिंवंत केल्या होत्या.

3तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत.

4दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन.

5प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.

SongofSolomon 4 illustration - SongofSolomon Chapter 4

6लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.

7माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.

8माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.

9माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.

10माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस. तू बंदिस्त तळ्यासारखी, कारंज्यासारखी आहेस.

SongofSolomon 4 illustration - SongofSolomon Chapter 4

11तुझे अवयव डाळिंबाने आणि इतर फळांनी सर्व प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी, मेंदी,

12जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.

13तू बागेतल्या कारंज्यासाखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.

14उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.

15माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा.

SongofSolomon 4 illustration - SongofSolomon Chapter 4

16मी झोपलेली आहे. पण माझे हृदय जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते. “प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा, माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा! माझे डोके दवाने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.”

Chapter Complete

You have read SongofSolomon 4

16 verses