1शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझे प्रेम असलेल्या पुरुषाला तुम्ही पाहिलेत का?”
2मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात मला माझे प्रेम असलेला पुरुष सापडला. मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही. मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले. तिच्या खोलीत जिने मला जन्म दिला, तेथे नेले.
3यरुशलेमच्या स्त्रियांनो, रानहरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मला वचन द्या. मी जो पर्यंत तयार होत नाही तो पर्यंत प्रेम जागवू नका, प्रेम जागृत करु नका.
4खूप लोकांच्या समूहाबरोबर वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे? गंधरस व ऊद आणि इतर धूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या घुरासारखे त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.
5ही बघ, शलमोनाची प्रवासाला जाण्याची खुर्ची! साठ सैनिक, इस्राएलचे शक्तिमान सैनिक तिचे रक्षण करीत आहेत.

6ते सगळे प्रशिक्षित लढवय्ये आहेत. त्यांच्या बाजूला त्यांच्या तलवारी आहेत. रात्री येणाऱ्या कुठल्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
7राजा शलमोनाने स्वत:साठी प्रवासी खुर्ची तयार केली. लाकूड लबानोनहून आणले.
8चांदीचे खांब केले. पाठ सोन्याची केली. बैठक जाभळ्या रंगाच्या कापडाने मंढवली. त्यावर यरुशलेमच्या स्त्रियांनी प्रेमाने कलाकुसर केली.
9सियोनेच्या स्त्रियांनो, बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, ज्या दिवशी तो खूप आनंदी होता, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
10प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.

11तुझे दात तुकतीच आंघोळ करुन आलेल्या बकऱ्या सारखे आहेत. त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही.
You have read SongofSolomon 3
11 verses