Lumina
SongofSolomon

The Voice of My Beloved

SongofSolomon 2·Marathi Bible

1प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते.

2माझ्या सख्याने मला द्राक्षारसाच्या घरात आणले. माझ्यावर प्रेम करायची त्याची इच्छा होती.

3मनुका देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.

4माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे.

5यरुशलेमच्या स्त्रियांनो मला वचन द्या. तुम्हाला वनातील हरिणींची आणि रानमृगांची शपथ घालून विनवते की माझी तयारी होईयर्पंतप्रेम जागृत करु नका.

SongofSolomon 2 illustration - SongofSolomon Chapter 2

6मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते. तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.

7माझा प्रियकर मृगासारखा, हरिणाच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातूनपहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.

8माझा प्रियकर माझ्याशी बोलतो, “प्रिये, हे सुंदरी ऊठ आपण दूर जाऊ या!”

9बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.

10शेतात फुले उमलली आहेत, आता गाण्याचे दिवस आले आहेत. ऐक कबूतरे परतली आहेत.

SongofSolomon 2 illustration - SongofSolomon Chapter 2

11अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत. बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे. प्रिये, सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.”

12माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस.

13आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या मळ्यांचा नाश केला आहे. आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत.

14माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची. माझा सखा कमलपुष्पांवर जगतो.

15जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो आणि सावल्या लांब पळून जातात प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्याहरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.

SongofSolomon 2 illustration - SongofSolomon Chapter 2

16रात्रीच्या वेळी मी माझ्या बिछान्यात माझे प्रेम असलेल्या पुरुषाला मी शोधते. मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.

17मी आता उठेन. मी शहराभोवती फिरेन. मी रस्त्यांवर आणि चौकांत माझे प्रेम असलेल्या पुरुषाला शोधीन. मी त्याला शोधले पण मला तो सापडला नाही.

Chapter Complete

You have read SongofSolomon 2

17 verses