Lumina
Psalms

A New Song of Salvation

Psalms 98·Marathi Bible

1परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

2त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला.

3परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.

4त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.

5पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.

Psalms 98 illustration - Psalms Chapter 98

6वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.

7कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.

8समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या.

9नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. [10] परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

Chapter Complete

You have read Psalms 98

9 verses