Lumina
Psalms

Under His Wings

Psalms 91·Marathi Bible

1तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.

2मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”

3देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल.

4तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.

5रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.

Psalms 91 illustration - Psalms Chapter 91

6अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.

7तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10 000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.

8तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.

9का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.

10तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही.

Psalms 91 illustration - Psalms Chapter 91

11देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.

12तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.

13तुमच्याजवळ सिंहावरुन आणि विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.

14परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.

15माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.

Psalms 91 illustration - Psalms Chapter 91

16मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.

Chapter Complete

You have read Psalms 91

16 verses