Lumina
Psalms

Our Eternal Dwelling Place

Psalms 90·Marathi Bible

1प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.

2देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.

3तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.

4तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.

5तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत.

Psalms 90 illustration - Psalms Chapter 90

6गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते.

7देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.

8तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे. देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.

9तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.

10आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.

Psalms 90 illustration - Psalms Chapter 90

11देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.

12आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.

13परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.

14तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.

15तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस. आता आम्हांला सुखी कर.

Psalms 90 illustration - Psalms Chapter 90

16तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु शकतोस ते त्यांना बघू दे.

17देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.

Chapter Complete

You have read Psalms 90

17 verses