Lumina
Psalms

Until I Entered the Sanctuary

Psalms 73·Marathi Bible

1देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला. शुध्द ह्दय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.

2मी जवळ जवळ घसरलो आणि पाप करायला लागलो.

3दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.

4ते लोक आरोग्य संपन्न आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही.

5त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही. दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत.

Psalms 73 illustration - Psalms Chapter 73

6म्हणून ते आतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत. ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.

7जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात. त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.

8ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत. आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात.

9आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.

10म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.

Psalms 73 illustration - Psalms Chapter 73

11ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही, सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”

12ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत आणि अधिक श्रीमंत होत आहेत.

13मग मी माझेच मन शुध्द का करु? मी माझे हात स्वच्छ का करु.

14देवा, मी दिवसभर त्रास भोगतो आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.

15देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती. परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.

Psalms 73 illustration - Psalms Chapter 73

16या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.

17मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.

18देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस. खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.

19अचानक संकटे येऊ शकतात आणि नंतर त्या गार्विष्ठ माणसांचा नाश होतो. भयंकर गोष्टी घडू शकतात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.

20परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रसारखे आहेत. आपल्या स्वप्रात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे तू त्या लोकांना अदृष्य करशील.

Psalms 73 illustration - Psalms Chapter 73

21मी फार मूर्ख होतो. मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो. देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो. मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.

22

23मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.

24देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.

25देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?

Psalms 73 illustration - Psalms Chapter 73

26कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.

27देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.

28मी मात्र देवाकडे आलो आहे. आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुराक्षित जागा बनवले. देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.

Chapter Complete

You have read Psalms 73

28 verses