Lumina
Psalms

The Reign of the Anointed

Psalms 2·Marathi Bible

1इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?

2त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.

3ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”

4परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.

5देव रागावला आहे आणि तो त्या लोकांनाकच सांगत आहे, “मी या माणसाची राजा म्हणून निवड केली तो सियोन पर्वतावर राज्य करेल सियोन हा माझा खास पर्वत आहे.” यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.

Psalms 2 illustration - Psalms Chapter 2

6

7आता मी तुम्हाला परमेश्वरराच्या कराराविषयी सांगतो परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो! आणि तू माझा मुलगा झालास.

8जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.

9लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचानाश करते तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू सकशील.”

10म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.

Psalms 2 illustration - Psalms Chapter 2

11परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.

12तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

Chapter Complete

You have read Psalms 2

12 verses