Lumina
Psalms

Song of Deliverance

Psalms 18·Marathi Bible

1तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.”

2परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे.

3त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.

4माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.

5थडग्याच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या. मृत्यूचा सापळा माझ्या पुढ्यात होता.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

6सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.

7पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.

8देवाच्या नाकातून धूर आला देवाच्या तोंडातून अग्रीच्या ज्वाळा निघाल्या. त्याच्या अंगातून ठिणग्या उडाल्या.

9परमेश्वराने आकाश फाडले आणि तो खाली आला तो घट् काळ्या ढगावर उभा राहिला.

10परमेश्वर उडत होता तो उडणाऱ्या करुबावर आरुढ होऊन वाऱ्यावर उंच उडत होता.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

11परमेश्वर त्याच्या सभोवती तंबूसारख्या पसरलेल्या काळ्या ढगात लपला होता. तो गडगडणाऱ्या दाट ढगात लपला होता.

12नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.

13परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला, त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.

14परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली परमेश्वराने विजेचे लोळ फेकून लोकांची त्रेधा उडवली.

15परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

16परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.

17माझे शत्रू माझ्यापेक्षा शक्तिमान होते. ते लोक माझा तिरस्कार करीत होते माझे शत्रू मला खूप भारी होते म्हणून देवाने माझे रक्षण केले.

18मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला. परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.

19परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने माझी सुटका केली. तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.

20मी निरपराध असल्यामुळे परमेश्वर मला माझे बक्षीस देईल मी काही चूक केली नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेल.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

21का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.

22परमेश्वराच्या सर्व निर्णयांची मी नेहमी आठवण ठेवतो. मी त्याचे नियम पाळतो.

23मी त्याच्या समोर स्वत ला शुध्द आणि निरपराध राखले. मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.

24म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.

25परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

26परमेश्वर, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणान्यांना तू नामोहरण करतोस.

27परमेश्वरा, तू दीनांना मदत करतोस पण तू गर्विष्ठांना खाली पाहायला लावतोस.

28परमेश्वरा, तू माझा दिवा लावतोस देव माझ्या भोवतालचा अंधार उजळतो.

29परमेश्वरा, तुझ्या मदतीने मी सैनिकांबरोबर पळू शकतो. देवाच्या मदतीने मी शत्रूच्या भिंतीवर चढू शकतो.

30देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

31परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.

32देव मला शक्ति देतो शुध्द जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो.

33देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो. तो मला उंचावर स्थिर ठेवतो.

34देव मला युध्दाचे शिक्षण देतो. त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात.

35देवा, तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

36माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो.

37नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करु शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही.

38मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील.

39देवा, तू मला युध्दात शक्तिमात बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस.

40तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

41माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यांनी परमेश्वराला सुध्दा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही.

42मी माझ्या शत्रूचे मारुन तुकडे केले. त्यांची अवस्था वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले.

43माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.

44ते लोक माझ्या विषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील. ते परदेशी मला घाबरतील.

45ते परदेशी गलितगात्र होतील. ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.

Psalms 18 illustration - Psalms Chapter 18

46परमेश्वर जिवंत आहे, मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे.

47देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली, त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्ते खाली आणले.

48परमेश्वरा, तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुध्द उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस. तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस.

49परमेश्वरा, म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशांत गुणगान गातो.

50परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युध्द जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो. तो दावीदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील.

Chapter Complete

You have read Psalms 18

50 verses