1परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2दावीदाने परमेश्वराला वचन दिले. दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही.
4माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी, याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”

6आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले. आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7आपण पवित्र तंबूत जाऊ. या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत. तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.

11परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील, मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन. गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.

16मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
You have read Psalms 132
18 verses