Lumina
Psalms

From the Rising of the Sun

Psalms 113·Marathi Bible

1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.

2परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.

3पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.

4परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.

5कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो.

Psalms 113 illustration - Psalms Chapter 113

6देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.

7देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.

8आणि देव त्या लोकांना महत्व देतो.देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.

9स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.

Chapter Complete

You have read Psalms 113

9 verses