Lumina
Numbers

Israel's Journeys

Numbers 33·Marathi Bible

1मोशे आणि अहरोन यांनी इस्राएल लोकांना मिसरामधून लहान लहान टोव्व्यांनी बाहेर काढले. त्यांनी ज्या ज्या देशांतून प्रवास केला ते या प्रमाणे:

2त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:

3पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करुन बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.

4मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.

5इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

6ते सुक्कोथहून एथामला गेले. लोकांनी तेथे वाळवंटाच्या काठावर तंबू ठोकले.

7त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.

8लोकांनी पीहहीरोथ सोडले आणि ते समुद्रामधून चालत गेले. ते वाळवंटाकडे गेले. नंतर ते तीन दिवस वाळवंटातून चालत होते. लोकांनी मारा येथे तळ दिला.

9लोकांनी मारा सोडले व ते एलिमला जाऊन राहिले. तिथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुराची झाडे होती.

10लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू ठोकले.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

11त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि त्सीन वाळवंटात तळ दिला.

12त्सीन वाळवंट सोडून ते दफकाला आले.

13लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.

14लोकांनी आलूश सोडले व रफिदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.

151लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सीनाय वाळवंटात तळ दिला.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

16त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.

17किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.

18हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू ठोकले.

19रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.

20रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

21लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.

22रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.

23लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.

24शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.

25लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

26मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.

27लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.

28तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.

29लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू ठोकले.

30हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

31त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.

32बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.

33होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.

34याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.

35अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

36लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.

37लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.

38याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.

39अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123वर्षाचा होता.

40कनान देशातील नेगब जवळ अराद शहर होते. अर्द येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

41लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.

42त्यांनी सलमोना सोडले व ते पुनोनला आले.

43पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.

44लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारिमला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.

45मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

46लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन दिबलाथाईमला आले.

47अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू ठोकले.

48लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.

49त्यांनी यार्देन नदीच्या यार्देन खोऱ्यात तंबू ठोकले. त्यांचे तंबू बेथ-यारीमोथापासून अकाशीयाच्या शेतापर्यंत होते.

50त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

51“इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग: तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.

52तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.

53तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा प्रदेश तुम्हाला देत आहे. तो तुमच्या कुटुंबाचा होईल.

54तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.

55“तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.

Numbers 33 illustration - Numbers Chapter 33

56मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.”

Chapter Complete

You have read Numbers 33

56 verses