Lumina
Numbers

The Second Census

Numbers 26·Marathi Bible

1मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:

2तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”

3त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,

4“वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.

5जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.)ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

6हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.

7रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.

8पल्लूचा मुलगा अलियाब.

9अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.

10त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

11परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.

12शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेनमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.

13जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.

14ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.

15गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी:सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

16आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ.

17अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.

18गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.

19यहुदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशी:शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ. (यहुदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.)

20

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

21पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.

22ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.

23इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.

24याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.

25इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

26जुबुलूनच्या कुळातील कुळे:सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.

27जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.

28योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.

29मनश्शेच्या कुळातील कुळे:माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.

30गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

31अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ.

32शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.

33हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

34ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.

35एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती:शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

36एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.

37ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.

38बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.

39शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ.

40बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

41ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.

42दानच्या कुळातील कुळे होती:शूहामचे शूहामी कूळ.हे कूळे दानच्या कुळातील होते.

43शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.

44आशेरच्या कुळातील कुळे होती:इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.

45बरीयाच्या कुळातील कुळे होती:हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

46(आशेरला सेरा नावाची मुलगी होती)

47ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.

48नफतालीच्या कुळातील कुळे होती:यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.

49येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.

50ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

51म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.

52परमेश्वर मोशेला म्हणाला,

53“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.

54मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.

55पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

56प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.

57त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.

58लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ.अम्राम कोहाथच्या कुळातील होता.

59अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.

60नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.

Numbers 26 illustration - Numbers Chapter 26

61पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.

62लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.

63मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते.

64खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.

65कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.

Chapter Complete

You have read Numbers 26

65 verses