Lumina
Nahum

God's Anger Against Nineveh

Nahum 1·Marathi Bible

1परमेश्वर जसा सहनशील आहे, तसाच सामर्थ्यवान आहे परमेश्वर अपराधी लोकांना शिक्षा करील. त्यांना मोकळे सोडणार नाही परमेश्वर वाईट माणसांना शिक्षा करण्यासाठी येत आहे झंझावात आणि वादळ यांच्याद्धारे तो आपली शक्ती दाखवील माणूस जमिनीवर धूळीतून चालतो, तर परमेश्वर ढगांवरून चालतो.

2परमेश्वर समुद्राला कठोरपणे बोलेल आणि समुद्र आटेल तो सर्व नद्या कोरड्या पाडेल बाशान व कर्मेल येथील समृध्द प्रदेश सुकून नष्ट होईल लबानोनमधील फुले कोमेजतील.

3परमेश्वर येईल तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल टेकड्या वितळून जातील परमेश्वर येईल तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल. एवढेच नाही तर, हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.

4परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.

5परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो

Nahum 1 illustration - Nahum Chapter 1

6पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.

7यहूदा, तू परमेश्वराविरुध्द कट कारचत आहेस? पण परमेश्वर संपूर्ण विनाश करणार आहे. त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस.

8भांड्याखाली जळणाव्या काटेरी झुडपाप्रमाणे तुझा संपूर्ण नाश होईल सुक्या काटक्या जशा चटकन् जळून जातात, तसा तुझा पटकन् नाश होईल.

9अश्शूर, तुझ्याकडून एक माणूस आला. त्याने परमेश्वराविरुध्द कट रचला. त्याने वाईट सल्ला दिला.

10परमेश्वराने यहूदाला पुढील गोष्टी सांगितल्या अश्शूरचे लोक चांगले बलवान आहेत. त्यांच्यापाशी मोठे सैन्य आहे. पण ते मारले जातील. त्यांचा अंत होईल माझ्या लोकांनो, मी तुम्हाला त्रास दिला पण यापुढे, कधीही मी तुम्हाला त्रास देणार नाही.

Nahum 1 illustration - Nahum Chapter 1

11आता मी तुमची अश्शूरच्या सत्तेपासून मुक्तता करीन मी तुमच्या मानेवरचे जोखड काढून घेईन तुम्हाला बांधणाव्या साखळ्या मी तोडून टाकीन.

12अश्शूरचा राजा परमेशवर तुझ्याबद्दल पुढील आज्ञा देतो: तुझे नाव लावायला तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. तुझ्या दैवळातील कोरलेल्या मूर्ती व धातूचे पतळे यांचा मी नाश करीन मी तुझे थडगे तयार करत आहे. कारण तुझा विनाश लवकरच ओढवणार आहे.

13यहूदा पाहा! पर्वतांवरून कोण येत आहे, ते पाहा! शुभवार्तीघेऊन दूत येत आहे तो म्हणतो की तेथे शांतता आहे यहूदा तुझे खास सण साजरे कर तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहेस त्या गोष्टी कर दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करुन तुझा पराभव करणार नाहीत त्या सर्व दुष्टांचा नाश झाला आहे.

14तुझ्यावर हल्ला करण्यासाठी शत्रू येत आहे तेव्हा तुझ्या शहरातील भक्कम जागांचे रक्षण कर रस्त्यांवर नजर ठेव युध्दाला सज्ज हो! लढाईची तयारी कर!

15परमेशवर इस्राएलच्या वैभवाप्रमाणेच याकोबलाही पुन्हा वैभव प्राप्त करून देईल इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणेच याकोबचे ऐश्वर्य होईल शत्रूने त्यांचा नाश केला आणि त्याचे द्राक्षमळे उदध्वस्त केले.

Chapter Complete

You have read Nahum 1

15 verses