Lumina
Micah

Against Wicked Leaders

Micah 3·Marathi Bible

1तुम्ही माझ्या माणसांचा नाश करीत आहात.तुम्ही त्यांची कातडी सोलता आणि हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करता.

2आता, तुम्ही कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हाला ओ देणार नाही. नाही, परमेश्वर तुमच्यापासून तोंड लपवेल. का? कारण तुम्ही दुष्कृत्ये करता.”

3भोंदू वा खोटे संदेष्टे परमेश्वराच्या लोकांना खोेट्यागोष्टी सांगत आहेत. परमेश्वर ह्या संदेष्ट्यांबद्दल पुढीलप्रमाणे उद्गार काढतो.“हे संदेष्टे पोटाद्वारे चालतात. जर लोकांनी ह्या संदेष्ट्यांना खायला घातले तर ते ओरडतात, शांती नांदेल. पण जर लोकांनी त्यांना खायला दिले नाही तर हे संदेष्टे किंचाळतात, “युध्दाला तयार राहा!”

4म्हणून ही जणू काही तुमची रात्र आहे. म्हणूनच तुम्हाला दृष्टांन्त होत नाहीत. भविष्यात काय घडणार हे तुम्ही पाहू शकत नाही, म्हणून तुम्ही जणू अंधारातच आहात. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळला आहे. तेव्हा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ते पाहू शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्यापुढे जणू अंधार पसरलाय!

5द्रष्टे लज्जित झालेत ज्योतिषी ओशाळलेत. ते काहीच बोलणार नाहीत. का? कारण परमेश्वर त्यांच्याशी बोलणार नाही.

Micah 3 illustration - Micah Chapter 3

6पण परमेश्वराच्या आत्म्याने मला अधिकार, चांगुलपणा व सामर्थ्याने भरुन टाकले आहे. मी याकोबला त्याच्या पापांबद्दल सांगीत. हो! मी इस्राएलशी त्याच्या पापांविषयी बोलेन.”

7याकोबच्या नेत्यांनो आणि इस्राएलच्या शास्त्यांनो, माझे ऐका! तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता. सरळ गोष्टीला तुम्ही वाकडी करता.

8लोकांना मारुन तुम्ही सियोनची उभारणी केली. तुम्ही लोकांना फसवून यरुशलेम उभे केले.

9यरुशलेमचे न्यायाधीश, न्यायालयात कोणी जिंकायचे, हे ठरविण्यासाठी लाच घेतात. यरुशलेममधील याजकांना लोकांना शिकवण देण्यापूर्वी लोकांनी पैसे द्यावेच लागतात. भविष्य बघण्यापूर्वीच संदेष्ट्यांना पैसे चारावे लागतात. आणि मग हे नेते अपेक्षा करतात की परमेश्वराने त्यांना मदत करावी. ते म्हणतात, “आपले काहीही वाईट होणार नाही. कारण परमेश्वर आपल्याबरोबरच राहतो!”

10नेत्यांनो, तुमच्यामुळे सियोनचा नाश होईल. ती नांगरट जमीन होईल. यरुशलेम म्हणजे दगडधोड्यांची रास होईल. मंदिर ज्या टेकडीवर आहे, ती टेकडी निर्जन होईल व त्यावर घनदाट रान माजेल.”

Micah 3 illustration - Micah Chapter 3

11शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.

12तेथे पुष्कळ देशातले लोक जातील. ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या. याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या. मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील व आपण त्याचे अनुसरण करु.” परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल. मग तो सर्व जगात पसरेल.

Chapter Complete

You have read Micah 3

12 verses