Lumina
Matthew

Lord of the Sabbath

Matthew 12·Marathi Bible

1तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय?

2देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्रच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवागी होती.

3आणि तुम्ही नियमशास्त्र वाचले आहे की, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत.

4मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.

5पवित्र शास्त्र म्हणते, मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

6कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”

7येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला.

8सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”

9येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय?

10तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

11मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.

12नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली.

13परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले.

14आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.

15यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

16“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीति करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील.

17तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.

18वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील.

19सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. यशया 42:1-4

20मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

21सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, ‘हा दाविदाचा पुत्र असेल काय?’

22परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, ‘भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.’

23परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, ‘आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.

24आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?

25आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वत:चे लोक तुम्हांला चूक ठरवितील.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

26परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्र्चित समजा.

27“किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.

28एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.

29म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.

30एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

31“जर तुम्हांला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.

32अहो सापाच्या पिल्लांनो. तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंत:करणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.

33चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.

34आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील.

35कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

36काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”

37येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणीक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही.

38कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.

39जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरूद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे.

40न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणीया पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

41“जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही.

42तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते.

43नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या ह्या पापी पिढीचे होईल.”

44तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहट उभे होते.

45तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”

Matthew 12 illustration - Matthew Chapter 12

46त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?”

47मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हाणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत.

48कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत.”

49त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला.

50पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला.

Chapter Complete

You have read Matthew 12

50 verses