Lumina
Leviticus

Purification After Childbirth

Leviticus 12·Marathi Bible

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2“इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.

3आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.

4नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस काढावे लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये.

5परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.

Leviticus 12 illustration - Leviticus Chapter 12

6“तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धीहोण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोंकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.

7तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी.

8मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”

Chapter Complete

You have read Leviticus 12

8 verses