1आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
2आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. आम्ही वापरत असलेल्या लाकडाला पैसे मोजावे लागतात.
3आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते. आम्ही दमून जातो. पण आम्हाला विश्रांती नाही.
4पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्याबरोबर करार केला.
5आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.

6गुलाम आमचे राज्यकर्ते झाले. त्यांच्यापासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
7अन्नासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो. वाळवंटात तलवारधारी माणसे असतात.
8आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
9शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
10शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली. त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.

11आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
12वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
13आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
14आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आणि वाईट गोष्टी घडल्या.
15ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.

16सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
17पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
18परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
19परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
20तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?

21मी बूजीचा मुलगा याजक यहेज्केल. मी परागंदा झालो होतो. मी खास्द्यांच्या देशात खबार कालव्याच्या काठी असताना आकाश दुभंगले व मला देवाचा दृष्टान्त झाला. 30व्या वर्षीच्याचौथ्या महिन्याच्या (जूनच्या) पाचव्या दिवसाची ही घटना आहे.यहोयाखीन राजाच्या परागंदा होण्याच्या काळातील 5 व्या वर्षी, महिन्याच्या 5 व्या दिवशी, यजेज्केलला परमेश्वराचा शब्द प्राप्त झाला.
22
You have read Lamentations 5
22 verses