Lumina
Joshua

Kings Conquered

Joshua 12·Marathi Bible

1यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.

2हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अधर्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती.

3यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.

4बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता

5तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी व माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.

Joshua 12 illustration - Joshua Chapter 12

6परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला हेता.

7यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय.

8डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:

9यरीहोचा राजा बेथेल1जवळील आयचा राजा1

10यरुशलेमचा राजा1हेब्रोनाचा राजा1

Joshua 12 illustration - Joshua Chapter 12

11यर्मूथाचा राजा1लाखीशाचा राजा1

12एग्लोचा राजा1गेजेराचा राजा1

13दबीराचा राजा1गेदेराचा राजा1

14हर्माचा राजा1अरादाचा राजा1

15लिब्नाचा राजा1अदुल्लामाचा राजा1

Joshua 12 illustration - Joshua Chapter 12

16मक्के दाचा राजा1बेथेलचा राजा1

17तप्पूहाचा राजा1हेफेराचा राजा1

18अफेकाचा राजा1लशारोनाचा राजा1

19मादोनाचा राजा1हासोराचा राजा1

20शिम्रोन-मरोनाचा राजा1अक्षाफाचा राजा1

Joshua 12 illustration - Joshua Chapter 12

21तानखाचा राजा1मगिद्दोचा राजा1

22केदेशाचा राजा1कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1

23दोर पर्वतावरील दोराचा राजा1गिलगाल येथील गोयीमचा राजा1

24तिरसाचा राजा1असे एकंदर राजा31

Chapter Complete

You have read Joshua 12

24 verses