Lumina
Jonah

Jonah's Prayer

Jonah 2·Marathi Bible

1“तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.

2मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.

3“समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.

4मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो मला कायमचे असे बंदिवासात राहावे लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा, तू मला नवजीवन दिलेस!

5“माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.

Jonah 2 illustration - Jonah Chapter 2

6“काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.

7फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”

8मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.

9मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला,

10“त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”

Chapter Complete

You have read Jonah 2

10 verses