Lumina
Jeremiah

A Message to Baruch

Jeremiah 45·Marathi Bible

1‘बारुख, तू असे म्हणालास की, माझ्या दुष्टीने हे फार वाईट आहे. परमेश्वराने मला यातनांबरोबर दु:ख दिले आहे. मी फार कंटाळलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मी विश्रांती घेऊ शकत नाही.”

2“यिर्मया, बारुखला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘मी बांधलेले मीच तोडून टाकीन. मी पेरलेले मीच उपटून टाकीन. मी सर्व यहूदात असेच करीन.

3बारुख, तू स्वत:साठी मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतोस तशी अपेक्षा करु नकोस. कारण मी सर्वांवर संकट आणीन.’ परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या ‘तुला खूप ठिकाणी जावे लागेल पण तू जेथे जाशील, तेथून मी तुझी जिवंतपणे सुटका करीन.”

4यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश मिळाला, तो वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी होता.

5हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे:

Chapter Complete

You have read Jeremiah 45

5 verses