1मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेम नगरीत शिरले आणि मधल्या प्रवेशद्वाराजवळ बसले. समगारचा राज्यपाल नेर्गलशरेसर व नबो सर्सखीम हे मोठे अधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी ह्यांचा त्यात समावेश होता.
2सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले.
3खास्द्यांच्या सैन्याने सिद्कीयाचा व त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांचा पाठलाग केला आणि यरिहोच्या मैदानात त्याना त्यांनी पकडले. त्यांनी सिद्कीयाला पकडून बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे नेले तेव्हा नबुखद्नेस्सर हमाथ प्रांतातील रिब्ला येथे होता. सिद्कीयाचे काय करायचे हे नबुखद्नेस्सरने ठरविले.
4रिब्लामध्ये, सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले.
5मग नबुखद्नेस्सरने सिद्कीयाचे डोळे काढले आणि साखळ्यांनी बांधून बाबेलला नेले.

6बाबेलच्या सैन्याने राजवाड्याला व यरुशलेम मधील घरांना आग लावली त्यांनी यरुशलेमची तटबंदी फोडली.
7बाबेलच्या राजाच्या विशेष संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा होता. त्याने यरुशलेममध्ये राहिलेल्या लोकांना कैद केले. व बाबेलला नेले. त्याला अगोदरच शरण आलेल्यांना त्याने कैद केले. एकंदरीत त्याने येरुशलेममधील सर्व लोकांनाच कैद केले.
8पण नबूजरदानने यहूदातील काही गरीब लोकांना सोडले. ह्या लोकांजवळ काहीही नव्हते म्हणून नबूजरदानने त्यांना द्राक्षमळे व जमीन दिली.
9पण नबुखद्नेस्सरने यिर्मयाच्या बाबतीत, नबूजरदानला ताकीद दिली होती. नबूजरदान बाबेलच्या राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख होता. नबुखद्नेस्सरने अशी ताकीद दिली होती की.
10“यिर्मयाला शोधून काढा व त्याची काळजी घ्या. त्याला इजा करु नका. तो मागेल ते त्याला द्या.”

11म्हणून राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या प्रमुख सेनाधिकाऱ्याला, नेर्गल सरेसर या मोठ्या अधिकाऱ्याला आणि सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना यिर्मयाला शोधण्यासाठी पाठविले.
12मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पाहऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला.
13यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात असताना त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता:
14“यिर्मया मूळ कुशचा रहिवासी असलेल्या एबद-मलेखला संदेश दे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो: माझे यरुशलेमबद्दलचे भाकीत मी लवकरच खरे ठरवीन. माझे संदेश अरिष्टावरुन खरे ठरतील, चांगल्या गोष्टी घडून नाही. सर्व गोष्टी खऱ्या ठरत असताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील.
15पण, एबद-मलेख, मी तुला त्या दिवशी वाचवीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. तू ज्या लोकांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही.

16तू युध्दात मरणार नाहीस, तर तू निसटशील आणि जगशील. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून हे घडेल.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
17यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते.
18नबूजरदानला यिर्मया सापडताच, तो त्याच्याशी बोलला तो म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराने, तुझ्या देवानेच हे अरिष्ट ह्या स्थळी येणार म्हणून भाकीत केले होते.
You have read Jeremiah 39
18 verses