Lumina
Jeremiah

Jeremiah in the Dungeon

Jeremiah 38·Marathi Bible

1परमेश्वर पुठे असे म्हणतो ‘यरुशलेम नगरी निश्र्चितपणे बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. तो ती हस्तगत करेल.”

2यिर्मयला जे हे लोकांना सांगत होता, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकले व ते सिद्कीया राजाकडे गेले. राजाला म्हणाले, ‘यिर्मयाला ठार मारलेच पाहिजे. अजूनही शहरात असलेल्या सैनिकांना तो नाउमेद करीत आहे. तो जे काय सांगत आहे, त्यामुळे प्रत्येकाचे धैर्य गळत आहे. आपले चांगले व्हावे असे यिर्मयाला वाटत नाही. यरुशलेमच्या लोकांचे वाईट होण्याची त्याची इच्छा आहे.’

3सिद्कीया राजा त्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “यिर्मया तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला थोपवू शकत नाही.”

4मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला मल्कीयाच्या पाण्याच्या टाकीत टाकले, (मल्कीया राजपुत्र होता) राजाचे पहारेकरी राहत असलेल्या मंदिराच्या चौकात ही टाकी होती. त्या अधिकाऱ्यांनी दोरांच्या साहाय्याने यिर्मयाला पाण्याचा टाकीत उतरविले. त्या टाकीत पाणी अजिबात नव्हते, फक्त चिखल होता. यिर्मया त्या चिखलात रुतला.

5यिर्मयाला त्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत टाकले हे एबद-मलेख याने ऐकले. एबद-मलेख कुश देशाचा होता. तो राजाच्या पदरी एक प्रतिहारीम्हणून होता. सिद्कीया राजा बन्यामीनच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजवाड्यातून निघाला आणि राजाशी बोलण्यासाठी त्या प्रवेशद्वाराजवळ गेला.

Jeremiah 38 illustration - Jeremiah Chapter 38

6एबद-मलेख राजाला म्हणाला, “राजा, माझ्या धन्या, ते अधिकारी दुष्टपणे वागले आहेत. त्यांनी संदेष्टा यिर्मयाला दुष्टपणे वागविले. त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीत टाकले आहे. तो मरावा म्हणून त्यांनी त्याला तेथे टाकले आहे!’

7

8नंतर एबद-मलेख या कुशीला राजाने हूकूम दिला, “एबद-मलेख, राजवाड्यातून तीन माणसे तुझ्याबरोबर घे. जा आणि यिर्मया मरायच्या आधी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”

9एबद-मलेख याने आपल्याबरोबर माणसे घेतली. प्रथम तो राजवाड्यातील कोठाराच्या खालच्या खोलीत गेला. त्याने काही चिंध्या व जुने पुराणे कपडे तेथून घेतले. त्या चिंध्या त्याने दोराच्या साहाय्याने यिर्मयाकडे सोडल्या.

10एबद-मलेख हा कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि जुने पुराणे कपडे तुझ्या काखेत ठेव. आम्ही तुला वर ओढू तेव्हा त्या चिंध्यांचा गादीप्रमाणे उपयोग होईल व दोऱ्या तुला लागणार नाहीत.” एबद-मलेखने सांगितल्याप्रमाणे यिर्मयाने केले.

Jeremiah 38 illustration - Jeremiah Chapter 38

11त्या लोकांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले, मग यिर्मया मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला.

12नंतर सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलवायला कोणाला तरी पाठविले. त्याने यिर्मयाला परमेश्वराच्या मंदिराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आणविले मग राजा म्हणाला, “यिर्मया, मी तुला काही विचारतो माझ्यापासून काही लपवू नकोस. मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांग!”

13यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “मी तुला काही सांगितले, तर तू बहुधा मला मारशील मी तुला जरी सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस!”

14पण सिद्कीया राजाने गुप्तपणे शपथ घेतली. सिद्कीया म्हणाला, परमेश्वराने आम्हाला जीव व जीवन दिले. परमेश्वर नक्कीच आहे म्हणून मी वचन देतो की यिर्मया मी तुला मारणार नाही. तुला मारु इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात मी तुला देणार नाही, असेही मी तुला वचन देतो.

15मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर हा इस्राएलचा देव आहे. तोच म्हणतो ‘तुम्ही जर बाबेलच्या राजाला शरण गेलात, तर तुमच्या जिविताचे रक्षण होईल. यरुशलेम जाळले जाणार नाही. तू आणि तुझे कुटुंबीयही जगाल.

Jeremiah 38 illustration - Jeremiah Chapter 38

16पण तू शरण जाण्यास नकार दिलास, तर यरुशलेम खास्द्यांच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. ते यरुशलेम जाळून भस्मसात करतील आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.”

17पण सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “खास्द्यांच्या सैन्याला जाऊन मिळालेल्या यहूदाच्या लोकांची मला भीती वाटते. सैनिक मला त्या यहूदाच्या लोकांच्या ताब्यात देतील व ते लोक माझ्याशी अत्यंत वाईट वागतील, मला मारतील म्हणून मी घाबरतो.”

18पण यिर्मया म्हणाला, “सैनिक तुला त्या यहूदाच्या लोकांच्या स्वाधीन करणार नाहीत. राजा सिद्कीया, माझ्या सांगण्याप्रमाणे वागून परमेश्वराची आज्ञा पाळ. मग तुझ्यासाठी सर्व सुरळीत होईल आणि तुझा जीवही वाचेल.

19पण तू बाबेलच्या राजाला शरण जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. परमेश्वराने मला पुढीलप्रमाणे सांगितले.

20यहूदाच्या राजवाड्यात मागे राहिलेल्या सर्व स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या मुख्य अधिकाऱ्यांपुढे आणले जाईल. त्या स्त्रिया पुढील गाणे गाऊन तुमची चेष्टा करतील.तुमच्या चांगल्या मित्रांनी तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेले, आणि ते तुमच्याहून बलवान झाले, तेच ते मित्र ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. तुमचे पाय चिखलात रुतलेत. तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडले.’

Jeremiah 38 illustration - Jeremiah Chapter 38

21“तुमच्या बायका मुलांना बाहेर काढले जाईल. त्यांना बाबेलच्या सैन्याच्या स्वाधीन केले जाईल. तू स्वत:ही त्या सैन्याच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला बाबेलचा राजा पकडेल आणि यरुशलेम जाळले जाईल.”

22मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “मी तुझ्याशी बोललो हे कोणालाही सांगू नकोस. तसे केलेस, तर मरशील.

23कदाचित्. मी तुझ्याशी बोललो हे त्या अधिकाऱ्यांना कळेल. मग ते तुझ्याकडे येतील आणि म्हणतील, ‘यिर्मया, तू सिद्कीया राजाला काय सांगितलेस ते आम्हाला सांग तसेच सिद्कीया तुला काय म्हणाला तेही सांग. आमच्याशी खरे बोल व प्रत्येक गोष्ट सांग नाहीतर आम्ही तुला ठार मारु’

24जर ते असे म्हणाले तर तू त्यांना सांग ‘मी राजाकडे मला योनाथानच्या घरातील अंधार कोठडीत परत पाठवू नका.’ अशी गयावया केली. मी तेथे परत गेलो, तर मी मरेन.”

25ते वरिष्ठ अधिकारी यिर्मयाकडे येऊन प्रश्न विचारु लागले. खरेच असे घडले? मग राजाने हुकूम केल्याप्रमाणे यिर्मयाने सांगितले. मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला सोडले. यिर्मया व राजा यांच्यात झालेले बोलणे कोणालाही कळले नाही.

Jeremiah 38 illustration - Jeremiah Chapter 38

26मग यिर्मया, यरुशलेम जिंकले जाईपर्यंत, मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला.

27अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला.

28आणि सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरुशलेमच्या तटबंदीला भगदाड पडले.

Chapter Complete

You have read Jeremiah 38

28 verses