Lumina
Isaiah

God's Servant Israel

Isaiah 41·Marathi Bible

1तो सैन्याचा पाठलाग करतो पण त्याला कधीच ईजा होत नाही पूर्वी कधीही न गेलेल्या ठिकाणी तो जातो.

2ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.

3अती दूरच्या सर्व स्थळांनो, पाहा आणि भिऊन असा! पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो, भीतीने थरथर कापा! इकडे या आणि माझे ऐका.” आणि ते आले.

4“कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात.

5एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”

Isaiah 41 illustration - Isaiah Chapter 41

6परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.

7पृथ्वीवर खूप लांब, दूरच्या देशात होतास, पण मी तुला बोलाविले व सांगितले, ‘तू माझा सेवक आहेस.”‘ मी तुझी निवड केली आणि मी कधीच तुझ्याविरूध्द गेलो नाही.

8काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.

9बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.

10तू तुझ्याविरूध्द असणाऱ्या लोकांना शोधशील पण ते तुला सापडू शकणार नाहीत. ते संपूर्णपणे नाहीसे होतील.

Isaiah 41 illustration - Isaiah Chapter 41

11मी परमेश्वर तुझा देव आहे, मी तुझा उजवा हात धरतो आहे, मी तुला सांगतो: घाबरू नकोस मी तुला मदत करीन.

12बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.

13“मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे. त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत. शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात. त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल. तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.

14तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”

15“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

Isaiah 41 illustration - Isaiah Chapter 41

16वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.

17वाळवंटात गंधसरू, बाभूळ, ऑलिव्ह (तेल) सरू, देवदारू आणि भद्रदारू हे वृक्ष वाढतील.

18लोक हे सर्व पाहतील आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल. हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”

19परमेश्वर, याकोबचा राजा म्हणतो, “या आणि तुमचे काय मुद्दे आहेत ते मला सांगा तुमचे त्याबद्दलचे पुरावे मला दाखवा आणि मग आपण काय बरोबर आहे ते ठरवू.

20तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे.“सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.

Isaiah 41 illustration - Isaiah Chapter 41

21काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.

22“बघा! तुम्ही शून्य किंमतीचे आहात तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त कवडी किंमतीची माणसेच तुमची पूजा करू इच्छितात.”

23“मी उत्तरेकडील एका माणसालाउठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”

24हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले? त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणात्या मूर्तीने हे सांगितले का? नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही. त्या मूर्ती एक शब्दसुध्दा बोलत नाहीत. आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.

25सियोनला ह्या गोष्टीबद्दल सांगणारा पहिला मी म्हणजेच परमेश्वर आहे. मी यरूशलेमला दूताबरोबर संदेश पाठविला. “पाहा! तुझे लोक परत येत आहेत.”

Isaiah 41 illustration - Isaiah Chapter 41

26मी त्या खोट्या देवांना पाहिले. काहीही सांगण्याइतके ते शहाणे नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारले, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.

27ते सगळे देव कवडीमोलाचे आहेत. ते काही करू शकत नाहीत. त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.

28“माझ्या सेवकाकडे पाहा. मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खूष आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्याय्यमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल.

29तो रस्त्यात आवाज चढवणार नाही. तो रडणार अथवा किंचाळणार नाही.

Chapter Complete

You have read Isaiah 41

29 verses