Lumina
Isaiah

Hezekiah's Sickness Healed

Isaiah 38·Marathi Bible

1“परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला.

2यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला,

3“हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.

4मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”‘22पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?”

5परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची ही खूण असेल. “सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.”21मग यशया हिज्कीयाला म्हणाला, “अंजिरे वाटून तू तुझ्या दुखऱ्या भागावर लाव. मग तू बरा होशील.”

Isaiah 38 illustration - Isaiah Chapter 38

6

7आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:

8मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.

9म्हणून मी म्हणालो, “मी याह परमेश्वराला जिवंतांच्या भूमीवर यापुढे कधी पाहणार नाही. मी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना पाहणार नाही.

10माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.

Isaiah 38 illustration - Isaiah Chapter 38

11सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.

12मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”

13मी काय बोलू? माझ्या प्रभूने काय घडणार ते मला सांगितले. आणि माझा प्रभूच ते घडवून आणील माझ्या मनाला खूप क्लेश झाले म्हणून आता माझ्या सगळ्या आयुष्यात मी नम्र होईन.

14माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर. मला शुध्द व निरोगी व्हायला मदत कर. मला परत जिवंत कर.

15पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.

Isaiah 38 illustration - Isaiah Chapter 38

16मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत. अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत. मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत. ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत.

17माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे.

18मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”

19

20

Isaiah 38 illustration - Isaiah Chapter 38

21त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या.

22ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.

Chapter Complete

You have read Isaiah 38

22 verses