Lumina
Isaiah

Judgment on the Earth

Isaiah 24·Marathi Bible

1सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल.

2देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.

3ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला.

4ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.

5द्राक्षवेली सुकत चालल्या आहेत. नवीन मद्य खराब आहे. पूर्वी लोक सुखी होते. पण आता तेच लोक दु:खी झाले आहेत.

Isaiah 24 illustration - Isaiah Chapter 24

6लोकांचे आनंदप्रदर्शन थांबले आहे. सगळे आनंददात थांबले आहेत. सांरगीतून आणि डफातून उठणारे आनंदसंगीत बंद पडले आहे.

7लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.

8“संपूर्ण गोंधळ” हेच नाव या शहराला शोभेल. शहराचा नाश झाला आहे. लोक घरात प्रवेश करू शकत नाहीत. दारांना अडसर घातले आहेत.

9बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.

10सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.

Isaiah 24 illustration - Isaiah Chapter 24

11सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात. पण काही झाडावर राहतातच. अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.

12वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील. त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल. परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.

13ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा. दूरच्या देशांतील लोकांनो, इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”

14जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.

15ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे. त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.

Isaiah 24 illustration - Isaiah Chapter 24

16लोकांना संकटाची चाहूल लागून ते घाबरून जातील. काही लोक सैरावैरा पळतील. पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील. त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील. पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,” आकाश फाटेल आणि प्रलय होईल. पृथ्वीचा पाय कापू लागेल.

17धरणीकंप होऊन जमीन दुभंगेल.

18पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.

19त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर, न्यायानिवाडा करील.

20खूप राजे एकत्र जमतील आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल. पण शेवटी, बऱ्याच काळानंतर, त्यांना न्याय दिला जाईल.

Isaiah 24 illustration - Isaiah Chapter 24

21यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.

22प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.

23तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते. पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे. तो परत कधीच बांधला जाणार नाही.

Chapter Complete

You have read Isaiah 24

23 verses