Lumina
Isaiah

The Mountain of the LORD

Isaiah 2·Marathi Bible

1पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.

2नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.

3याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.

4तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे.

5दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत.

Isaiah 2 illustration - Isaiah Chapter 2

6तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.

7दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना?

8येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.

9गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.

10परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.

Isaiah 2 illustration - Isaiah Chapter 2

11जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.

12हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व

13उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.

14हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.

15त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील.

Isaiah 2 illustration - Isaiah Chapter 2

16सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील.

17लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.

18त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.

19मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.

20जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.

Isaiah 2 illustration - Isaiah Chapter 2

21माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा व यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी व पाणी बंद करील.

22तो (देव) वीरांचा व मोठ्या योध्द्यांना दूर करील. न्यायासनावर बसणारे, भोंदू संदेष्टे, मांत्रिक व तथाकथित वडीलधारी मंडळी इत्यादीनां दुसरीकडे नेऊन ठेवील.

Chapter Complete

You have read Isaiah 2

22 verses