Lumina
Isaiah

Burden of Damascus

Isaiah 17·Marathi Bible

1एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील. दमास्कसचे सरकार पडेल. इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल. सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.

2त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.

3एफ्राइम खोऱ्यातील धान्याच्या मोसमाप्रमाणे तो काळ असेल. मजूर शेतात पिकलेली पिके कापून गोळा करतात. नंतर कणसे तोडून ते धान्य गोळा करतात.

4तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल. सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.

5त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल.

Isaiah 17 illustration - Isaiah Chapter 17

6लोक, स्वत:च्या हाताने केलेल्या वेद्यांकडे जाणार नाहीत. त्यांनी खोट्या देवांसाठी तयार केलेल्या अशेरा स्तंभाचा आणि धूपाच्या वेद्यांचा ते मान ठेवणार नाहीत.

7त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होतीत्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल.

8असे घडण्याचे कारण तू तुला वाचवणाऱ्या देवाला विसरलास. देव हे तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे तुझ्या लक्षात राहिले नाही.दूरच्या देशांतून तू चांगल्या जातीच्या द्राक्षवेली आणल्यास तू त्यांची लावणी करशील पण त्या वाढणार नाहीत.

9एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.

10समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक. ते मोठ्याने रडत आहेत. लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.

Isaiah 17 illustration - Isaiah Chapter 17

11लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल. देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील. लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल. वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.

12त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील. उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल. त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.

13इथिओपियामधील नद्यांकाठच्या प्रदेशाकडे पाहा. तेथे इतके कीटक आहेत की त्यांचे गुणगुणणे तुम्ही ऐकू शकाल.

14तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)

Chapter Complete

You have read Isaiah 17

14 verses