Lumina
Isaiah

The Branch from the Stem of Jesse

Isaiah 11·Marathi Bible

1परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही.

2तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलुपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.

3

4त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.

5गायी आणि अस्वले एकत्र गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांची पिल्ले एकत्र राहतील आणि कोणीच कोणाला इजा करणार नाही. सिंह गाईसारखे चारा खातील. एवढेच नव्हे तर सापही माणसाला दंश करणार नाहीत.

Isaiah 11 illustration - Isaiah Chapter 11

6तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.

7ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.

8त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.

9त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.

10देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.

Isaiah 11 illustration - Isaiah Chapter 11

11तेव्हा एफ्राइमला (इस्राएलला) यहुदाचा मत्सर वाटणार नाही. यहुदाला कोणी शत्रूच राहणार नाहीत. यहुदा एफ्राइमला (इस्राएलला) काही त्रास देणार नाही.

12पण एफ्राइम (इस्राएल) व यहुदा दोघे मात्र पलिष्ट्यांवर हल्ला करतील. आकाशात उडणाऱ्या दोन पक्ष्यांनी जमिनीवरील किड्याकाटकावर झडप घालावी तसेच हे दोन देश पलिष्ट्यांवर तुटून पडतील. दोघे मिळून पूर्वेकडच्या लोकांना लुटतील व अदोम, मवाब, व अम्मोन ह्यांच्यावर राज्य करतील.

13पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील.

14ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.

15त्या वेळेला तू म्हणशील:“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”

Isaiah 11 illustration - Isaiah Chapter 11

16देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.

Chapter Complete

You have read Isaiah 11

16 verses