Lumina
Hosea

Punishment for Israel

Hosea 9·Marathi Bible

1इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल.

2इस्राएल लोक देवाला मद्य अर्पण करणार नाहीत. ते परमेश्वराला बळी अर्पण करणार नाहीत. त्यांचे बळी प्रेत संस्कारात खाल्ले जाणाऱ्या अन्नसारखे असतील. जो कोणी ते खातो तो अशुध्द होतो. त्यांच्या भाकरी परमेश्वराला मंदिरात पोचणार नाहीत. त्या त्यांनाच खाव्या लागतील.

3ते (इस्राएली) परमेश्वराच्या सुट्या व समारंभ साजरे करू शकणार नाहीत.

4इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.

5संदेष्टा म्हणतो, “इस्राएला, ह्या गोष्टी जाणून घे. शिक्षेची वेळ आली आहे. तुझ्या कुकर्मांची किंमत मोजण्याची वेळ आली आहे.” पण इस्राएलचे लोक म्हणतात, “संदेष्टे मूर्ख आहे. देवाचेच आत्मे असलेला हा माणूस वेडा आहे.” संदेष्टा म्हणतो, “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. तुमच्या तिरस्काराची सजा तुम्हाला मिळेल.”

Hosea 9 illustration - Hosea Chapter 9

6परमेश्वर आणि संदेष्टा एफ्राईम वर लक्ष ठेवण्याऱ्या रखवालदाराप्रमाणे आहेत. पण रस्ताभर अनेक सापळे आहेत. आणि लोक संदेष्ट्याचा त्याच्या परमेश्वराच्या घरातसुध्दा, तिरस्कार करतात.

7गिबाच्या घटनेमध्ये इस्राएल लोक जितके दुष्ट होते तितकेच ते (आजही) आहेत. परमेश्वर त्यांची पापे स्मरेल व त्यांना त्याबद्दल शिक्षा करील.

8वाळवंटातील ताज्या द्राक्षांप्रमाणे त्यावेळी इस्राएल होता. तुमचे पूर्वज मोसमातील अंजिराच्या पहिल्या बहराप्रमाणे मला दिसले. पण मग ते बाल-पौरा कडे आले आणि ते बदलले. ते कुजल्यासारखे झाले ते ज्यांच्यावर प्रेम करीत त्या भयंकर गोष्टीसारखे (दैवतांसारखे) झाले.

9एफ्राईमचे वैभव पक्षाप्रमाणे दूर उडून जाईल तेथे गर्भधारणा होणार नाही, प्रसूतीही होणार नाहीत आणि म्हणून बालकेही असणार नाहीत.

10पण जरी इस्राएलींनी मुले वाढविली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मी त्यांना मुलांचा वियोग घडविन. त्यांना सोडून देईन. पण त्यांना संकटाशिवाय काही मिळणार नाही.

Hosea 9 illustration - Hosea Chapter 9

11एफ्राईम आपल्या मुलांना सापळ्याकडे नेत आहे, हे मी पाहू शकतो एफ्राईम आपली मुले मारेकऱ्यापुढे आणतो. परमेश्वर, त्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे दे. गर्भापात होणारी गर्भाशये दे दूध न देणारे स्तन दे.

12

13त्यांची सर्व पापे गिल्गालमध्ये आहेत. म्हणून तेथपासूनच मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.मी त्यांना बळजबरीने माझे घर सोडायला लावीन. कारण ते दुष्कृत्ये करतात. ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही. त्याचे नेते बंडखोर आहेत. ते माझ्याविरुध्द गेले आहेत.

14एफ्राईमला शिक्षा होईल. त्यांचे मूल मरत आहे. ते नि:संतान होतील. ते बालकांना कदाचित् जन्म देतील, पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.

15ते लोक माझ्या परमेश्वराचे ऐकणार नाहीत. म्हणून तोही त्यांचे ऐकणार नाही. आणि ते बेघर होऊन राष्ट्रांतून भटकतील.

Hosea 9 illustration - Hosea Chapter 9

16इस्राएल बहरलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे आहे. त्याला परमेश्वराकडून पुष्कळ गोष्टी मिळत गेल्या पण त्याने दैवांच्या मानासाठी खूपखूप वेद्या बांधल्या. त्याची भूमी अधिकाधिक चांगली होत गेली, तेव्हा त्याने अधिक चांगले स्तंभ दैवतांच्या मानासाठी उभे केले.

17इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला फसविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनी त्यांचा अपराध कबूल केलाच पाहिजे. परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडेल. तो त्यांच्या स्मारक स्तंभांचा नाश करील.

Chapter Complete

You have read Hosea 9

17 verses