Lumina
Hosea

Judgment Against Israel and Judah

Hosea 5·Marathi Bible

1एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे.

2इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत.

3इस्राएलचा अहंकार त्यांच्याविरुध्द पुरावा आहे. म्हणून इस्राएल आणि एफ्राईम त्यांच्या पापांना अडखळतील. त्याच्याबरोबर यहूदाही अडखळेल.

4“लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ व ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे.

5ते परमेश्वराशी प्रामाणिक राहात नाहीत. त्यांची मुले परक्यांपासून झालेली आहेत. आता परमेश्वर त्यांचा आणि त्यांच्या देशाचा पून्हा नाश करील”

Hosea 5 illustration - Hosea Chapter 5

6“गिबात शिंग फुंका, रामात तुतारी फुंका. बेथ-आवेनमध्ये इषारा द्या. बन्यामीन, तुझ्यामागे शत्रू लागला आहे.

7शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल ह्या गोष्टी नक्की घडून येतील, असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर) इस्राएलच्या घराण्यांना देतो.

8दुसऱ्यांची मालमत्ता चोरणाव्या चोरांसारखे यहूदाचे नेते आहेत. म्हणून मी (परमेश्वर)माझ्या रागाचा त्यांच्यावर पाण्याप्रमाणे वर्षाव करीन.

9एफ्राईमला शिक्षा होईल. द्राक्षांप्रमाणे तो चिरडला व दाबला जाईल. का? कारण त्याने ओंगळाला अनुसरण्याचे ठरविले.

10कसर ज्याप्रमाणे कापडाच्या तुकड्याचा नाश करते, तसाच मी एफ्राईमचा नाश करीन. लाकडाचा तुकडा सडून नष्ट होता, तसेच मा यहूदाला नष्ट करीन.

Hosea 5 illustration - Hosea Chapter 5

11एफ्राईमने स्वत:चा आजार व यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.

12का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे. यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे. मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन. मी त्यांचे हरण करीन. आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.

13लोक त्यांचा अपराध कबूल करेपर्यंत आणि माझा शोध घेईपर्यंत मी माझ्या जागी परत जाईन. हो! त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”

14“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.

15दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.

Chapter Complete

You have read Hosea 5

15 verses