1“अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
2परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
3मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
4त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल व तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल. लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे त्याचा सुवास असेल.
5इस्राएलचे लोक, पुन्हा, माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील. ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”

6“एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे. फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे. माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
7शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात. चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत. त्यामुळे सज्जन जगतील व दुर्जन मरतील.
8पथूएलचा मुलगा योएल ह्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला:
9नेत्यांनो, हा संदेश ऐका! ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका! तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का? नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का? नाही.
You have read Hosea 14
9 verses