Lumina
Exodus

The Priestly Garments

Exodus 28·Marathi Bible

1परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.

2“तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी विशेष वस्त्रे तयार कर त्यामुळे त्याला मान व आदर मिळेल

3ही वस्त्रे बनविणारे कारागीर इस्राएल लोकात आहेत; ही विशेष कला मीच त्यांना दिलेली आहे; ह्या वस्त्रामुळे अहरोन माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल मग त्याने याजक या नात्याने माझी सेवा करावी.

4तुझा भाऊ अहरोन व त्याची मुले ह्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही वस्त्रे बनवावीत: न्यायाचा ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल किंवा फेटा व कमरबंद,

5त्या कारागिरांनी सोन्याची जर आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्त्रे तयार करावीत.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

6“सोन्याची जर व निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करुन घ्यावेत;एफोद व कमरबंद

7एफोदाच्या दोन्ही खांद्यावर दोन खांदपटृ्या असाव्यात, या खांदपट्ट्या एफोदाच्या दोन्ही कोपऱ्यांना जोडाव्यात.

8“एफोद बांधण्यासाठी कारागिरांनी फार काळजीपूर्वक एक पट्टी विणावी; ही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याची जर, व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने विणावी.

9“मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत.

10एकावर सहा नांवे व दुसऱ्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे कोरावीत.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

11कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत.

12ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावीत; परमेश्वरासमोर उभे राहताना अहरोन हा खास रत्ने जडलेला एफोद घालून जाईल आणि त्या रत्नावर कोरलेल्या नांवामुळे देवाला इस्राएल लोकांची आठवण होईल.

13एफोदावर ती रत्ने पक्की रहावीत म्हणून त्यांच्यासाठी शुद्ध सोन्याची कोंदणे बसवावीत;

14पीळ घातलेल्या दोरी सारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्यात व त्या कोंदणात बसवाव्यात.

15“न्यायाचा ऊरपटही तयार करून घ्यावा; कुशल कारागिरांनी जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

16तो चौरस दुमडलेला दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी एक एक वीत म्हणजे नऊ नऊ इंच असावी.

17त्यात सुंदर रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;

18दुसऱ्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरा;

19तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्यराग;

20आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

21न्यायाच्या ऊरपटावर इस्राएलच्या प्रत्येक मुलामागे एक या प्रमाणे बारा रत्ने, प्रत्येक मुलाचे नांव कोरलेली अशी असावीत.

22“न्यायाच्या ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात.

23न्यायाच्या ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;

24ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.

25पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

26सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करुन न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्यात.

27सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या खांदपटृ्यांखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पटृवर लावाव्यात.

28न्यायाच्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळया फितींनी बांधाव्यात; त्यामुळे ऊरपट एफोदाच्या घट्ट धरून राहील, घसरणार नाही.

29“अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या न्यायाच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.

30न्यायाच्या ऊरपटात तू उरीम व थूम्मीम ठेव अहरोन परमेशवरासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

31“एफोदाबरोबर घालावयाचा झागा संपूर्ण निळया रंगाचा करावा;

32त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोंवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.

33निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोंवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;

34त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत.

35याजक या नात्याने माझी सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

36“शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात त्याप्रमाणे तिच्यावर ‘परमेश्वरासाठी पवित्र’ ही अक्षरे कोरावीत.

37ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला (फेट्याला) समोरील बाजूस निव्व्या फितीने बांधावी;

38ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या भेटी इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील त्यात जर काही दोष असेल तर तो त्याने काढावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील व अर्पिण्यास ती पात्र होतील.

39“कातलेल्या तलम सणाच्या पांढऱ्या कापडाचा एक अंगरखा विणावा एक मंदिल-फेटा-व एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.

40अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; त्यामुळे त्या मुलांचा मान व आदर राखला जाईल.

Exodus 28 illustration - Exodus Chapter 28

41तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या मुलांना ही वस्त्रे घाल, त्यांच्या डोक्यावर विशेष प्रकारचे तेल ओतून त्यांना आभिषेक करून त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.

42“त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.

43आणि अहरोन व त्याचे मुलगे ज्या ज्या वेळी दर्शनमंडपात पवित्रस्थानापुढे याजक म्हणून सेवा करण्यास जातील त्या त्या वेळी त्यांनी हे चोळणे घातलेच पाहिजेत; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्याच्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”

Chapter Complete

You have read Exodus 28

43 verses