Lumina
Exodus

Laws of Justice and Festivals

Exodus 23·Marathi Bible

1“इतर लोकांविरुद्ध खोट्या अफवा पसरवू नका; जर तुम्हाला कोर्टात साक्ष द्यावयाची असेल तर खोटे बोलणाऱ्या दुष्ट माणसाच्या मदतीसाठी खोटी साक्ष देण्यात सहभागी होऊ नका.

2“सर्वजण एखादी गोष्ट करतात म्हणून तुम्हीही ती खरी मानून करु नका. जर एखादा जनसमूह चुकीची गोष्ट करीत असेल तर तुम्ही त्याच्यांत सामील होउ नका; तुम्हीही चुकीची गोष्ट करावी म्हणून त्यांनी तुमचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे मुळीच ऐकू नका; तुम्ही तर जे योग्य व न्याय्य आहे तेच करावे.

3“एखाद्या गरीब माणसाचा न्याय होताना, दया येऊन वाईट वाटल्यामुळे काही जण त्याची बाजू उचलून धरतील, परंतु त्याची बाजू खरी असल्याशिवाय तुम्ही तसे करु नये.

4“जर तुम्हाला एखादा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव दिसले तर त्याचा मालक तुमचा शत्रू असला तरी तुम्ही ते त्याच्या मालकाकडे नेऊन सोडावे.

5“जास्त ओझ्याच्या भारामुळे एखाद्या जनावराला चालता येत नसल्याचे तुम्ही पाहिले तर ते जनावर तुमच्या शत्रुचे असले तरी तुम्ही थांबून त्या जनावराला मदत करावी.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

6“तुम्ही एखाद्या गरीब माणसावर अन्याय होऊ देऊ नका; त्या गरीबाचा न्याय इतर कोणत्याही सामान्य माणसासारखाच होऊ द्यावा.

7“कोणाला दोष देण्याअगोदर फार काळजीपूर्वक विचार करा; कोणावरही खोटे दोषारोप करु नका; एखाद्या निष्पाप वा निरपराधी माणसाला मरणाची शिक्षा होऊ देऊ नये; जो कोणी निरपराधी माणसाला ठार मारतो तो दुष्ट आहे; अशा दुष्टास मी कधीच क्षमा करणार नाही.

8“एखादा अपराधी माणूस, खोटी साक्ष देण्याकरता तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेतल्यामुळे न्यायाधीश आंधळे बनतात; त्यांना सत्य दिसत नाही आणि अशा लाचलूचपतीमुळे चांगले सज्जन लोकही खोटे बोलू लागतात.

9“तुम्ही परक्याला कधीही छळू नये; परक्याला कसे वाटते हे तुम्हाला चांगले माहीत आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसरदेशात परके होता.

10“सहा वर्षे जमिनीची मशागत करा; पेरणी करा; धान्य पिकवा; चांगला हंगाम येऊ द्या.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

11परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.

12“तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर कामकऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना मोकळे मोकळे वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.

13“हे सर्व नियम तुम्ही अवश्य व कटाक्षाने पाळावेत; इतर दैवतांची उपासना करु नका; त्यांची नांवेही तुमच्या तोंडाने उच्चारू नका.

14“दरवर्षी तुम्हाला तीन विशेष सुट्ट्या असतील; ह्या सुट्ट्यांच्या दिवसात तुम्ही माझी उपासना करण्याकरता विशेष ठिकाणी तुम्ही माझ्याकडे यावे.

15पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

16“दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल; यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळावा.तिसरी सुट्टी ‘मंडपाचा सणाच्या’ वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा.

17“अशा रीतीने वर्षातून तीन वेळा माझ्या उपासनेच्या विशेष ठिकाणी तुम्ही सर्वानी माझ्याकडे म्हणजे याव्हे कडे म्हणजेच आपल्या प्रभूकडे यावे.

18“तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करु नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये.

19“हंगामाच्या वेळी जेव्हा तुम्ही धान्य गोळा करता तेव्हा त्या प्रत्येक प्रथम उपजातील उत्तम तुम्ही आधी परमेश्वराच्या मंदिरात आणावे“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवून खाऊ नये.”

20देव म्हणाला, “मी एका दूताला तुमच्याकडे पाठवीत आहे तो तुमच्यापुढे चालून, मी तुमच्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे तुम्हांस घेऊन जाईल; तो तुमचे संरक्षण करील.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

21तुम्ही त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या मागे चाला; त्याच्याविरुद्ध बंड करु नका. तुम्ही त्याच्या विरुद्ध काही चुकीच्या गोष्टी कराल तर तो तुम्हांला क्षमा करणार नाही; माझे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे.

22तो जे जे सांगले ते ते सर्व तुम्ही ऐकले पाहिजे; मी सांगतो ते सर्व तुम्ही केले पाहिजे असे तुम्ही कराल तर मी तुम्हांबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.”

23देव म्हणाला, “माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी अशा निरनिराव्व्या लोकांच्या देखत त्या देशात तुम्हाला घेऊन जाईल.

24“परंतु या सर्व लोकांच्या दैवतांची पूजा करु नका; त्यांना नमन करु नका; त्याच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही कधीही वागू नये; त्यांच्या मूर्तीचा तुम्ही नाश करावा, आणि त्यांच्या मूर्तीच्या स्मारकांचे दगड व स्तंभ तोडून फोडून टाकावे.

25तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; तुम्ही असे कराल तर माझ्या कृपेने तुम्हाला भरपूर अन्नपाणी मिळेल मी तुमच्या मधून रोगराई काढून टाकीन.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

26तुमच्या सर्व स्त्रिया मुलेबाळे प्रसवतील कोणीही वांझ असणार नाही; जन्म देताना त्यांचे एकही बाळ मरणार नाही. आणि मी तुम्हाला दीर्घायुषी करीन.

27“तुम्ही जेव्हा तुमच्या शत्रुविरुद्ध लढाल तेव्हा मी माझे महान सामर्थ्य तुमच्यापुढे पाठवीन-माझ्या महान सामर्थ्याची नुसती बातमी तुमच्या पुढे जाईल आणि तुमचे शत्रु घाबरून जातील; त्यांचा पराभव करण्यास मी तुम्हास मदत करीन; तुमच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्यात रणांगणावर गोंधळ उडेल व ते लोक पळून जातील.

28मी तुमच्या पुढे गांधील माशा पाठवीन; त्यामुळे त्या गांधील माशाहिव्वी, कनानी, व हित्ती लोकांना तुमच्या देशातून निघून जावयास भाग पाडतील.

29परंतु त्या सगव्व्या लोकांना मी लगेच तुमच्या देशातून घालवून देणार नाही आणि एका वर्षभरात मी हे करणार नाही; कारण मी तसे फार लवकर केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग जंगली जनावरांची वाढ होऊन देशात ते वरचढ होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल.

30तेव्हा मी त्या लोकांना तुमच्या देशातून हळूहळू घालवून देईन; तेव्हा तुम्ही देश व्यापण्यास पुढे चालावे, आणि तुम्ही जसे पुढे जाल तसे मी तेथील इतर लोकांना तुमच्यापुढून घालवून देईन.

Exodus 23 illustration - Exodus Chapter 23

31“मी तुम्हाला तांबडा समुद्र ते थेट युप्रेटीस नदी एवढा सारा प्रदेश देईन; तुमची पश्चिमेकडील सीमा पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत म्हणजे भूमध्यसमुद्रापर्यंत व पूर्वेकडील सीमा अरबी वाळवंटापर्यंत, अशा तुमच्या प्रदेशाच्या सीमा असतील. मी तुम्हाला तेथे राहाणाऱ्या लोकांचा पराभव करावयास लावीन व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.

32तुम्ही त्या लोकांच्या बरोबर किंवा त्यांच्या दैवतांबरोबर कोणताही करार करु नये.

33तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापव्व्यासारखे अडकाविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या दैवतांची उपासना करण्यास सुरवात कराल.”

Chapter Complete

You have read Exodus 23

33 verses