Lumina
Ecclesiastes

Death Comes to All

Ecclesiastes 9·Marathi Bible

1या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगव्व्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात.

2जो माणूस अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. तो कोण आहे याला महत्व नाही. पण हे म्हणणे खरे आहे:“जिवंत कुत्रा मेलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो.”

3जिवंत माणसांना ते मरणार आहेत हे माहीत असते. पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते. मेलेल्यांना कुठलेच बक्षिस मिळत नाही. लोक त्यांना लवकरच विसरतात.

4माणूस मेल्यानंतर त्याचे प्रेम. त्याचा द्वेष, मत्सर हे सर्व जाते. आणि मेलेला माणूस पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टीत कधीच भाग घेणार नाही.

5तेव्हा आता जा, तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा. द्राक्षारस (मद्य) प्या आणि आनंदी व्हा. तुम्ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल.

Ecclesiastes 9 illustration - Ecclesiastes Chapter 9

6चांगले कपडे घाला आणि चांगले दिसा.

7प्रेम असलेल्या पत्नीबरोबर आयुष्य आनंदात घालवा. तुमच्या छोट्याशा आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा. देवाने तुम्हाला पृथ्वीवर छोटे आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच तुमच्याकडे आहे हे जाणून या आयुष्यात तुम्हाला जे काम करायचे आहे त्याचा आनंद लुटा.

8प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.

9मी या आयुष्यात योग्य नसलेल्या आणखीही काही गोष्टी पाहिल्या. सगव्व्यांत जोराने धावणारा धावपटू शर्यत जिंकत नाही: सर्वशक्तीमान सैन्य नेहमीच लढाई जिंकते असे नाही. सर्वांत शहाण्या माणसाला त्याने कमावलेले अन्न नेहमीच खाता येते असे नाही. खूप हुशार असलेल्या माणसाला संपत्ती मिळते असे नाही आणि सुशिक्षित माणसाला त्याच्या योग्य अशी स्तुती नेहमी लाभत नाही. वेळ आली की त्या सर्वांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात.

10पुढच्या क्षणी काय घडणार आहे ते माणसाला कळत नाही. तो जाव्व्यात अडकलेल्या माश्यासारखा असतो. माशालाही काय घडणार आहे ते माहीत नसते. तो सापव्व्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्यालाही पुढे काय घडणार आहे ते माहीत नसते. त्याच प्रमाणे माणूसही अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या सापव्व्यात अडकतो.

Ecclesiastes 9 illustration - Ecclesiastes Chapter 9

11मी या आयुष्यात शहाणपणाची गोष्ट करणार माणूस पाहिला. आणि ते मला फार महात्वाचे वाटते.

12थोडे लोक असलेले एक लहान शहर होते. एक महान राजा त्या शहराविरुध्द लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले.

13पण त्या शहरात एक विद्धान होता. तो विद्धान गरीब होता. पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरुन गेले.

14पण मी अजूनही म्हणेन की शहाणपण शक्तीपेक्षा चांगले आहे. ते लोक त्या गरीबाचे शहाणपण विसरून गेले. आणि तो जे काही म्हणाला त्याकडे लक्ष देणेही त्यांनी सोडून दिले. पण तरीही शहाणपण चांगले असते यावर माझा अजूनही विश्वास आहे.

15विद्धान माणसाने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजानेओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.

Ecclesiastes 9 illustration - Ecclesiastes Chapter 9

16शहाणपण हे युध्दातल्या तलवारी आणि भाले यापेक्षा चांगले असते. पण एक मूर्ख अनेक चांगल्यांचा नाश करू शकतो.

17योडचा मेलेल्या माशा सगव्व्यांत चांगल्या अत्तरालासुध्दा वाईट वास आणतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.

18विद्धान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात.

Chapter Complete

You have read Ecclesiastes 9

18 verses