1आणि जे लोक जन्मत:च मरतात त्यांच्यासाठी तर सर्व खूपच चांगले आहे. का? कारण या जगात जी वाईट कृत्ये केली जातात ती त्यांनी कधी पाहिली नाहीत.
2नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
3काही लोक म्हणतात, “हाताची घडी घालून स्वस्थ बसणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर काम केले नाही तर उपाशीपोटी मराल.”
4कदाचित ते सत्य असेल. पण मी म्हणतो की तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.
5ज्या गोष्टीचा अर्थ लागत नाही असे काही तरी मी पुन्हा पाहिले;

6एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
7एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
8जर एखादा माणूस पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण जर माणूस एकटा असताना पडला तर ते वाईट असते. त्याला मदत करायला तिथे कुणीही नसते.
9जर दोन माणसे एकत्र झोपली तर त्यांना ऊब मिळेल. पण जो माणूस एकटाच झोपतो त्याला उबदार वाटणार नाही. त्याला ऊब मिळणार नाही.
10शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर आधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.

11गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.
12कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुंरूगातून राज्य करायला आला असेल.
13पण मी आयुष्यात लोकांना बघितले आहे आणि मला हे माहीत आहे. लोक त्या तरुणाचेच ऐकतील. तोच नवीन राजा बनेल.
14खूप लोक त्या तरुणाच्या मागे जातील. पण नंतर त्या लोकांना तो आवडेनासा होईल. हाही अविचारच आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
15देवाची उपासना करायला जाताना काळजी घ्या. मूर्ख लोकांप्रमाणे यज्ञ करण्यापेक्षा देवाचे ऐकणे चांगले आहे. मूर्ख लोक बरेचदा वाईट गोष्टी करतातत आणि ते त्यांना कळत देखील नाही.

16देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पुथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:
You have read Ecclesiastes 4
16 verses