Lumina
Ecclesiastes

A Time for Everything

Ecclesiastes 3·Marathi Bible

1ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.

2रडण्याची आणि हसण्याचीही वेळ असते. दु:खी होण्याची आणि आनंदाने नाचायचीही वेळ असते.

3हातातली शस्त्रे खाली टाकण्याची वेळ असते आणि ती पुन्हा उचलण्याची ही वेळ असते.कुणाला तरी मिठी मारण्याचीही वेळ असते आणि ती मिठी सैल करण्याचीही योग्य वेळ असते.

4काहीतरी शोधण्याचीही वेळ यावी लागते आणि ते हरवले आहे हे जाणण्याचीही वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.

5वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते. गप्प बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.

Ecclesiastes 3 illustration - Ecclesiastes Chapter 3

6प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांतीचीही वेळ असते.

7खूप कष्ट केल्यानंतर माणसाला खरोखरच काही मिळते का? नाही.

8देवाने आपल्याला जे कष्ट करायला लावले ते सगळे मी पाहिले.

9देवाने आपल्याला या जगाबद्दलविचार करण्याची शक्ती दिली. पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही. आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो.

10मला समजलेली आणि लोकांनी करण्यासारखी अशी योग्य गोष्ट म्हणजे सुखी असणे, आणि आयुष्य असे पर्यंत आनंद लुटणे.

Ecclesiastes 3 illustration - Ecclesiastes Chapter 3

11प्रत्येक माणसाने खावे. प्यावे आणि कामाचा आनंद लुटावा असे देवाला वाटते. या देवाने दिलेल्या भेटी आहेत.

12देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे.

13पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आपण त्या आता बदलू शकत नाही. आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण ज्या लोकांना वाईट वागणूक मिळते त्यांना मदत करायची देवाची इच्छा आहे.

14मीही आयुष्यात या गोष्टी बघितल्या. मी पाहिले की न्यायालये न्यायाने आणि चांगुलपणाने भरलेली पाहिजेत. पण आता तेथे दुष्ट प्रवृत्ती आहेत.

15म्हणून मी स्वत:शीच म्हटले, “देवाने सगव्व्या गोष्टींची वेळ ठरवली आहे आणि त्याने लोक ज्या गोष्टी करतात त्यांचा न्याय करण्यासाठी ही योग्य वेळ ठरवली आहे. देव चांगल्या आणि वाईट लोकांचा न्याय करील.”

Ecclesiastes 3 illustration - Ecclesiastes Chapter 3

16लोक एकमेकांना ज्या गोष्टी करतात त्यांचा मी विचार केला आणि मी स्वत:शीच म्हणालो, “आपण पशूंसारखे आहोत, हे लोकांना कळावे असे देवाला वाटते.

17माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का?

18माणसांच्या आणि पशूंच्या शरीराचा नाश सारख्याच प्रकारे होतो. ते जमीनीतून आले आणि शेवटी ते तिथेच जातील.

19माणसाच्या आत्म्याचे काय होते हे कोणाला माहीत आहे? माणसाचा आत्मा वर देवाकडे जातो की पशूचा आत्मा खाली जमिनीत जातो हे कुणाला माहीत आहे?

20म्हणून मी पाहिले की माणूस जे काही करतो ते त्याने आनंदाने करावे हे उत्तम. त्याच्याकडे फक्त तेच आहे. माणसाने भविष्याची मुळीच चिंता करू नये. का? कारण भविष्यात काय घडणार आहे ते पहाण्यासाठी माणसाला कुणीही मदत करू शकणार नाही.

Ecclesiastes 3 illustration - Ecclesiastes Chapter 3

21खूप लोकांना वाईट वागणूक दिली गेल्याचे मी पुन्हा पाहिले. आणि या दु:खी लोकांचे सांत्वन करायला कुणीही नाही. हे ही मी पाहिले. दुष्ट लोकांकडेच सर्व सत्ता असते. हे मी पाहिले. आणि ते ज्या लोकांना दु:ख देतात त्यांचे सांत्वन करायलाही कुणी नसते, हे ही मी पाहिले.

22जे लोक जिवंत आहेत त्यांच्यापेक्षा मेलेल्या लोकांची अवस्था चांगली आहे असे मला वाटते.

Chapter Complete

You have read Ecclesiastes 3

22 verses