1मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.
2तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाहीदुरुस्त करू शकाल.
3मी आयुष्यात जे काही पाहिले त्यात ही एक गोष्ट आहे आणि ती योग्य नाही. राजे लोक करतात तशी ती एक चूक आहे.
4मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात.
5जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोडचावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.

6जो माणूस खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात पडू शकतो. जो माणूस भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता असते.
7जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.
8पण शहाणपण कुठलेही काम सोपे करते. धार नसलेल्या सुरीने कापणे कठीण असते. पण एखाद्याने जर सुरीला धार लावली तर कापणे सोपे जाते. शहाणपण तसेच आहे.
9एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.
10विद्धाव माणसाचे शब्द स्तुतीला पात्र ठरतात. पण मूर्खाचे शब्द त्याचा नाश ओढवतात.

11मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेडचासारख्या गोष्टी सांगायला लागतो.
12मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.
13मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.
14राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते.
15पण राजा जर चांगल्या घराण्यातूनआलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.

16जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
17लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
18राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.
19जिथे जिथे जाल तिथे तुम्ही चांगल्या गोष्टी करा.तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी कराल त्या तुमच्याकडे परत येतील.
20तुमच्याकडे जे काही आहे त्याची वेगवेगव्व्या ठिकाणी गुंतवणूक करापृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हाला कल्पना नसते.
You have read Ecclesiastes 10
20 verses