Lumina
Daniel

The Writing on the Wall

Daniel 5·Marathi Bible

1म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले.

2मद्य पिता-पिता ते त्यांच्या मूर्तिदेवतांची स्तुती करीत होते.ज्या देवतांची ते स्तुती करीत होते ती दैवते म्हणजे सोने, चांदी, कासे, लोखंड, लाकूड व दगड यापासून बनविलेले पुतळे होते.

3मग अचानक एक मानवी हात भिंतीवर लिहिताना दिसू लागला. भिंतीच्या गिलाव्यावर बोंटांनी शब्द कोरले गेले, राजवाड्याच्या दिवठाणा जवळच्या भिंतीवर हाताने लिहीले जात असताना राजाने पाहिले.

4बेलशस्सर राजा खूप घाबरला त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला व त्याचे हातपाय थरथर कापू लागले, पायातला जोर गेल्याने तो उभा राहू शकत नव्हता.

5राजाने मांत्रिक आणि खास्दी यांना बोलावून घेेतले. तो त्या ज्ञानी माणसांना म्हणाला,” हा लेख वाचून जो कोणी त्याचा अर्थ मला सांगेल, त्याला मी बक्षिस देईन. मी त्याला महावस्त्रे देईन,त्याला सोन्याची साखळी देईन. मी त्याला राज्याचा तिसरा महत्वाचा अधिकारी करीन.”

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

6मग राजाची सगळी ज्ञानी माणसे आत आली.पण त्यांना लेख वाचता आला नाही. त्याना त्याचा अर्थ कळू शकला नाही.

7बेलशस्सर राजाचे दरबारी गोंधळून गेले.त्यामुळे राजा फारच घाबरला,तो काळजीत पडला, त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.

8तेवढ्यात राजाचा व राजदरबाबाऱ्यांचा आवाज ऐकून राजमाता मेजवानी चालली होती तिथे आली. ती म्हणाली, “राजा, चिरंजीव भव! घाबरू नकोस,भीतीने असा पांढराफटक होऊ नकोस.

9तुझ्या राज्यात पवित्र दैवतांचा आत्मा ज्याच्यामध्ये वास करतो, असा एक माणूस आहे. तुझ्या वडिलांच्या काळात, ह्या माणसाने त्याला रहस्ये समजतात हे दाखवून दिले होते. तो अतिशय चलाख व सुज्ञ असल्याचे सिध्द झाले होते. ह्या गोष्टींत तो देवतासमान आहे. तुझ्या आजोबांनी, नबुखद्नेस्सर राजाने, त्याला सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून नेमले होते. मांत्रिकांवर व खास्द्यांवर त्याचा प्रभाव होता.

10मी ज्या माणसाबद्दल बोलत आहे, त्याचे नाव दानीएल आहे. राजाने त्याला बेलट्शस्सर असे नाव दिले आहे. बेलट्शस्सर (दानीएल) फार चलाख आहे व त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत, स्वप्नांचा अर्थ सांगण्याची, रहस्ये उलगडण्याची, अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला बोलावून घे, तोच तुला भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगेल.”

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

11मग दानीएलला राजासमोर उभे करण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला,” तुझे नाव दानीएल आहे का? माझ्या वडिलांनी यहूदातून आणलेल्या कैद्यांपैकी तू एक आहेस का?

12तुझ्या अंगात देवतांचा आत्मा आहे असे मला कळले आहे. तुला रहस्ये समजतात, तू फार चलाख व फार ज्ञानी आहेस असे मी ऐकले आहे.

13भिंतीवरचा हा लेख वाचण्यासाठी मांत्रिक व ज्ञानी माणसे येथे आली. मला, त्यांनी ह्या लेखाचा अर्थ स्पष्ट करून सांगावा,अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांना ते सांगता आले नाही.

14मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. तुला गोष्टींचा अर्थ स्पष्ट करता येतो आणि अवघड प्रश्नांची तू उत्तरे शोधू शकतोस असे मला समजले आहे. जर तू भिंतीवरचा लेख वाचून, त्याचा अर्थ मला सांगितलास, तर मी तुला महावस्त्रे देईन, सोन्याची साखळी तुझ्या गव्व्यात घालीन आणि तुला माझ्या राज्यातील प्रमुख पदांपैकी तीन क्रमांकाचे पद देईन.

15मग दानीएल राजाला म्हणाला “बेलशस्सर राजा तुझी दाने तुलाच लखलाभ हावेत! त्या भेटी पाहिजे तर दुसऱ्या कणला दे.मला काही नको.मात्र भी तूला भिंतीवरचा लेख वाचून अर्थ सांगतो.

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

16राजा,परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले.

17वेगवेगव्व्या राष्ट्रांतील आणि निरनिराळे भाषा बोलणारे लोक नबुखद्नेस्सरला घाबरत. का? कारण परात्पर देवाने त्याला महान बनविले होते. जर एखाद्याने मरावे असे नबुखद्नेस्सरला वाटले,तर तो त्याला मारे. ह्याउलट एखाद्याने जगावे असे त्याला वाटल्यास तो त्याला जगू देई. त्याच्या इच्छेप्रमाणे तो एखाद्याला महत्व देई, तर एखाद्याला क्षुद्र लेखी.

18पण नबुखद्नेस्सरला गर्व झाला, तो दुराग्रही बनला. म्हणून त्याची सत्ता काढून घेेतली गेली. त्याला सिंहासन सोडावे लागले, त्याच्या वैभवाचा लोप झाला.

19मग त्याला सक्तीने लोकांपासून दूर करण्यात आले.त्याचे हदय पशूप्रमाणे झाले. तो जंगली गाढवांबरोबर राहिला व त्याने गाईप्रमाणे गवत खाल्ले. तो दवात भिजला तो धडा शिकेपयैत त्याला हे भोगावे लागले. मगच त्याला पटले की मनुष्याच्या राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व असते, परात्पर देवाच्या इच्छेप्रमाणे राज्याचा राजा ठरविला जातो.

20पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूचआहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस.

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

21नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.

22म्हणूनच भिंतीवर ज्याने लिहिले तो हा हात देवाने पाठविला.

23भिंतीवरचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत:मेने, मेने, तेकेल, उफारसीन.

24“ह्या शब्दांचा अर्थ असा: मेने: देवाने तुझ्या राज्याच्या शेवटाचे दिवस मोजलेत.

25तेकेल: तुला तोलले गेले, तेव्हा तू उणा पडलास

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

26उफारसीन: तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे. त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल.”

27मग बेलशस्सरने दानीएलला महावस्त्रे देण्याचा हुकूम दिला. त्याने दानीएलला सोन्याची साखळी व राज्यैंतील तिसऱ्या क्रमांकाचे पद दिले. त्याच रात्री, खास्द्यांचा राजा, बेलशस्सर याला ठार मारण्यात आले

28

29आणि दारयावेश नावाचा बासष्ट वर्षे वयाचा मेदी नवा राजा झाला.

30सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी (सत्रप) नेमल्यास चांगले होईल असा विचार दारयावेशाने केला.

Daniel 5 illustration - Daniel Chapter 5

31ह्या 120 प्रांताधिकाऱ्यांवर (सत्रपांवर) लक्ष ठेवण्यासाठी त्याने जे तीनजण नेमले, त्यातील एक दानीएल होता. कोणी राजाला फसवू नये व राज्याचे काहीही नुकसान होऊ नये म्हणून दारयावेशने तिघांची नेमणूक केली.

Chapter Complete

You have read Daniel 5

31 verses