Lumina
Amos

God Has Spoken

Amos 3·Marathi Bible

1दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.

2शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.

3जाळ्यात दाणे नसतील तर, पक्षी जाळ्यात जाणार नाही आणि सापळ्याचे दार बंद झाले, तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.

4जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.

5प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल.

Amos 3 illustration - Amos Chapter 3

6सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.

7अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”

8

9म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”

10परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”

Amos 3 illustration - Amos Chapter 3

11माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या.

12इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील.

13हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

14शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”

15परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.

Chapter Complete

You have read Amos 3

15 verses