Lumina
2Corinthians

2Corinthians 7

2Corinthians 7·Marathi Bible

1मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंत:करणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु.

2मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.

3कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती.

4पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले.

5त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माइयाबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे.

2Corinthians 7 illustration - 2Corinthians Chapter 7

6जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:खावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही, जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की, माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:ख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे.

7तरी आता मी आनंदी आहे. यासाठी नाही की, तुम्हांला दु:खी केले, तर यासाठी की तुमच्या दु:खामुळे तुम्ही पशचात्ताप केला. कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दु:खी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानि झाली नाही.

8दैवी दु:ख तारणाप्रत नेणारा पश्र्चात्ताप आणते आणि कोणताही खेद बाळ्गीत नाही, पण जगिक दु:ख मरण आणते.

9पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वत:ला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वत:ला निर्दोष असे सिद्ध केले.

10म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे.

2Corinthians 7 illustration - 2Corinthians Chapter 7

11यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.

12मी त्याला तुमच्याविषयी अभिमानाने सांगितले आणि तुम्ही मला लज्जित केले नाही. पण जे सर्व काही आम्ही तुम्हांला सांगितले ते खरे खरे होते. तसा आमचा तुमच्याविषयीचा अभिमान जो तीताला सांगितला ह्याच रीतीने स्वत:चा खरेपणा सिद्ध केला.

13आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला.

14मला आनंद वाटतो की मला तुमच्याविषयी पूर्ण विश्वास वाटू शकतो.

15आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली.

2Corinthians 7 illustration - 2Corinthians Chapter 7

16अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले.

Chapter Complete

You have read 2Corinthians 7

16 verses