Lumina
2Chronicles

Jehoshaphat's Reign

2Chronicles 17·Marathi Bible

1आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले.

2त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.

3यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. ते बाल देवतेच्या भजनी लागला नाही.

4आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.

5परमेश्वारने यहोशाफाटला यहूदाचा खंबीर राजा केले. यहूदा लोकांनी यहोशाफाटसाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला.

2Chronicles 17 illustration - 2Chronicles Chapter 17

6परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.

7आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन - हईक, ओबद्या, जखऱ्या, नखनेल आणि मीखाया हे ते सरदार होत.

8त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.

9हे सरदार, लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.

10यहूदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करुन युध्दाला तोंड फोडले नाही.

2Chronicles 17 illustration - 2Chronicles Chapter 17

11काही पलिष्टे यहोशाफाटसाठी भेटी आणत. या राजाचे वर्चस्व ते जाणून असल्यामुळे रुपेही आणत. काही अरबी शेळ्या-मेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे 7,700 मेंढे आणि 7,700 बोकड त्याला दिले.

12यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारे बांधली.

13या कोठारांच्या गावामध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेममध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली.

14आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे: यहूदातील सरदार असे: अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.

15यहोहानानच्या हाताखाली 280,000 सैनिक होते.

2Chronicles 17 illustration - 2Chronicles Chapter 17

16जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.

17बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.

18यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.

19ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

Chapter Complete

You have read 2Chronicles 17

19 verses