Lumina
1Kings

The Ark Brought to the Temple

1Kings 8·Marathi Bible

1इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.

2तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्या विशेष उत्सवाचे होते.

3इस्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला.

4त्याबरोबरच सभामंडप आणि तिथली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी घेतली. या कामात याजकांना लेवींनी मदत केली.

5राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक करार कोशाच्या समोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

6मद याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला.

7करुबांचे पंख पवित्र करारकोशावर पसरलेले होते. पवित्र कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते.

8हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.

9करारकोशाच्या आता दोन शिलालेख होते. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.

10अतिपवित्र गाभाऱ्यातहा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

11परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.

12तेव्हा शलमोन म्हणाला,“आकाशात सूर्य तळपतो तो परमेश्वरामुळे, पण तो स्वत:मात्र काळोख्या ढगात राहत

13तुला युगानुयूग राहाण्यासाठी हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”

14सर्व इस्राएल लोक तेथे उभे होते. त्या समुदायाकडे वळून शलमोनाने देवाला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगितले.

15शलमोन राजाने मग एक दीर्घ प्रार्थना म्हटली. ती अशी;“इस्राएलचा परमेश्वर देव महान आहे. माझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने सर्व काही केले. परमेश्वर माझ्या वडीलांना म्हणाला,

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

16“माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’

17“इस्राएलच्या परमेश्वर देवाच्या सन्मानर्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या फार मनात होते.

18पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘मंदिर उभारण्याची तुझी तीव्र इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे.

19पण तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझा मुलगा हे मंदिर उभारुन दाखवील.’

20“परमेश्वराने अशा पध्दातीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

21त्यात पवित्र करारकोशासाठी एक गाभारा करवून घेतला आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांशील केलेला करार आहे. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले तेव्हा केलेला तो करार यात आहे.”

22एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात

23शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.

24माझे वडील दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करुन दाखवलेस. आपल्या मुखाने तू वनच दिलेस आणि तुझ्याच सामर्थ्यामुळे ते आज प्रत्यक्षात आले आहे.

25माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालने केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

26परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.

27“पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.

28पण कृपाकरुन माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.

29पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक.

30परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

31“कोणाच्या हातून कुणाच्या विरुद्व काही अपराध घडल्यास त्याला या वेदीपुढे आणण्यात येईल. तो दुखावलेला माणूस त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविरुद्व शापवाणी उच्चारील तो निरपराध असेल तर तो तशी गवाही देईल. आपण निर्दोष असल्याचे तो शपर्थपूर्वक सांगेल.

32तेव्हा तू ते स्वार्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. तो जर निरपराध असेल तर त्याच्या चांगुलपणाच्या प्रमाणात त्याला बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर.

33“कधी इस्राएलच्या लोकांच्या हातून पाप घडले तर शत्रू त्यांचा पराभव करील. अशा वेळी हे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन या मंदिरात प्रार्थना करतील, तुझी स्तोत्रे गातील.

34तेव्हा स्वर्गातून ती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. जो देश त्यांच्या पूर्वजांना तू दिलास तो त्यांना परत दे.

35“कधी त्यांच्या पापाचा दंड म्हणून तू त्यांच्या भूमीवर दुष्काळ पाडशील तेव्हा ते या ठिकाणाकडे येऊन तुझी पार्थना करतील व तुझ्या नावाची स्तुती करतील. ते त्यांच्या पापांपासून परावृत होतील.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

36तेव्हा स्वर्गातून त्यांची विनवणी ऐकून त्यांना क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव. आणि परमेश्वरा, तू त्यांना दिलेल्या भूमीवर पुन्हा पहिल्यासारखाच पाऊस पडू दे.

37“कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही. किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड येऊन सगळे पीक फस्त करील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील. किंवा एखाद्या दुख्याने लोक हैराण होतील.

38असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली व मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली.

39तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.

40आमच्या पूर्वचांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन राहावे म्हणून एवढे कर.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

41“तुझी थोरवी आणि सामर्थ्य इतर लोकांच्याही कानावर जाईल. मग ते दूरदूरच्या ठिकाणांहून या मंदिरात प्रार्थनेसाठी येतील.

42

43तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.

44“कधी तू आपल्या लोकांना शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझी प्रार्थना करतील.

45तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना मदत कर.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

46“लोकांच्या हातून काही पापही होईल. मी असं म्हणतो, कारण माणसाचा तो स्वभावच आहे. अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करुन दूरदेशी नेतील.

47तिथे गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चात्ताप होईल आणि ते प्रार्थना करतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले’ अशी ते कबुली देतील.

48ते कोठेतरी दूरच्या देशात असतील पण ते जर परराज्यात असताना अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेल्या या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर

49तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक.

50त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुध्द गेल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंमध्ये त्यांच्या बद्दल दया उत्पन्न कर.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

51ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस तापलेल्या भट्टीतून बाहेर काढावे तसे त्यांना सोडवलेस हे लक्षात असू दे.

52“परमेश्वर देवा, माझी आणि या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकुरुन ऐक. त्यांनी केव्हाही याचना केली तरी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे.

53पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करुन तू यांना आपले म्हटले आहेस. तू आम्हाला एवढे कबूल केले आहेस. मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.

54शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.

55मग त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद द्यावेत अशी मोठ्या आवाजात देवाला विनंती केली. शलमोन पुढे म्हणाला.”

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

56“परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत त्याने आपल्या फायद्याची अनेक वचने दिली होती. ती परमेश्वराने सर्वच्यासर्व खरी करुन दाखवली आहेत.

57आपल्या पूर्वजांना त्याने साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हाला कधीही अंतर देऊ नये.

58आम्ही त्याला अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे.

59आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.

60परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

61तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”

62मग राजासहित सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरा समोर यज्ञबली अर्पण केले.

63शलमोनाने 22,000 गुरे आणि 1, 20,000 मेंढरे मारली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वराला अर्पण केले.

64मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.

65शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या - पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.

1Kings 8 illustration - 1Kings Chapter 8

66नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायाला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराच्या सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.

Chapter Complete

You have read 1Kings 8

66 verses