Lumina
1John

1John 4

1John 4·Marathi Bible

1अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त याजगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे.

2आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तोदेवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आलाआहे.

3माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्येजो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे.

4ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेतयासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.

5पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तोआपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूरनेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो.

1John 4 illustration - 1John Chapter 4

6प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण

7जो प्रीति करतो तोदेवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीतिआहे.

8अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीति दर्शविली : त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठीकी त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.

9आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्याएकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्च्त्ति म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.

10प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे.

1John 4 illustration - 1John Chapter 4

11देवालाकोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीति करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याचीआम्हांवरील प्रीति पूर्णत्वास आणलेली आहे.

12अशा प्रकारे आम्हांला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्हीत्याच्यामध्ये राहतो: त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे.

13ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतोकी, जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे.

14जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतोतर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ति देवामध्ये रहाते.

15आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवरआम्ही विश्वास ठेवतो की, जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे. आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणिदेव त्या व्यक्तीमध्ये राहतो

1John 4 illustration - 1John Chapter 4

16अशा प्रकारे आमच्याबाबतीत प्रीति पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढविश्वासप्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्याजीवनासारखे आहे.

17प्रीतीमध्ये कोणतीही भिति नसते. उलट पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते. प्रीति शिक्षेशी संबंधितआहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही.

18आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली.

19जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,”पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जरएखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही!

20आम्हांलाख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.

1John 4 illustration - 1John Chapter 4

21प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीतिकरतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो.

Chapter Complete

You have read 1John 4

21 verses