Lumina
1Chronicles

Divisions of the Levites

1Chronicles 23·Marathi Bible

1आता दावीदाचे बरेच वय झाले होते. तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा केले.

2इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले.

3तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते.

4दावीद म्हणाला, “यांच्यापैकी 24,000 लेवी परमेश्वरच्या मंदिराच्या कामावर देखरेख करतील. 6,000 अंमलदार आणि न्यायाधीश म्हणून काम करतील.

54,000 द्वारपाल होतील आणि 4,000 देवांची स्तुतिगीते गातील. त्यांच्यासाठी मी खास वाद्ये करवून घेतली आहेत. त्यांच्या साथीवर ते देवाची स्तुती करतील.”

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

6लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार त्याने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.

7गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.

8लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.

9शिमीचे मुलगे असे शलोमोथ, हजिएल व हरान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.

10शिमीला चार मुलगे. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

11यरथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा. यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.

12कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.

13अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.

14मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे मुलगे लेवीच्या वंशातच गणले जात.

15गेर्षोम आणि अलियेजर हे मोशचे मुलगे.

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

16शबुएल हा गेर्षोमचा मोठा मुलगा.

17रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.

18शलोमीथ हा इसहारचा पहिला मुलगा.

19हेब्रोनचे मुलगे याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.

20उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

21महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे.

22एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या.

23मूशीचे मुलगे: महली, एदर आणि यरेमोथ.

24हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेवराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.

25दावीद म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांना शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

26तेव्हा लेवींना पवित्र निवासमंडप आणि उपासनेतील इतर उपकरणे सतत बाळगण्याची गरज नाही.”

27लेवी कुळतील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या माणसांची शिरगणती झाली.

28अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.

29मंदिरातील विशेष भाकरी मेजावर ठेवणे, पीठ, धान्यार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्व काही सिध्द करणे, मोजून मापून त्या वंस्तूची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.

30ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.

1Chronicles 23 illustration - 1Chronicles Chapter 23

31शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शन आणि सणावाराला देवाची होमार्पणे ते तयार करत. नित्य आराधनाही त्यांच्याकडेच होती. एका वेळी किती लेवींनी हे करायचे याचे नियम घालून दिलेले होते.

32त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.

Chapter Complete

You have read 1Chronicles 23

32 verses