Lumina
1Chronicles

Bringing Up the Ark

1Chronicles 13·Marathi Bible

1दावीद आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलला.

2मग दावीदाने इस्राएलमधील सर्व लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल आणि परमेश्वराचीही ती इच्छा असेल तर इस्राएलच्या सर्व भागात पसरलेल्या आपल्या बांधवांसाठी आपण एक संदेश पाठवू. आपापल्या नगरांत आणि खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांनाही आपण निरोप पाठवू. त्या सर्वांना आपण इकडे यायला सांगू.

3आपला करारकोश आपण पुन्हा यरुशलेममध्ये आणू. शौल राजा असताना आपण करारकोशाची नीट देखभाल केलेली नाही.”

4दावीदाच्या या बोलण्याशी सर्व इस्राएल लोक सहमत झाले. सर्वाना त्याचे म्हणने पटले.

5मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हामाथच्या प्रवेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांना मग दावीदाने एकत्र केले. किर्याथ यारीमहून हा कोश आणण्यासाठी ते सर्व जमले.

1Chronicles 13 illustration - 1Chronicles Chapter 13

6किर्याथ-यारीम म्हणजेच यहूदातील बाला येथे दावीदासह सर्व इस्राएली पोचले. करारकोश म्हणजे करुबांवरती राहणाऱ्या परमेश्वराचा करार कोश. तो आणावा म्हणून ते आले.

7लोकांनी अबीनादाबच्या घरातून हा करारकोश हलवला. तो नव्या गाडीवर चढवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.

8दावीद आणि इस्राएल लोक देवापुढे जल्लोष करत चालले. देवाची स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.

9किदोनच्या खळ्यापर्यंत ते पोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल जरा अडखळले. त्यामुळे करारकोश अगदी पडायला आला. तेवढ्यात उज्जाने कोशाला हात दिला.

10परमेश्वराचा उज्जावर कोप झाला. उज्जाने कोशाला हात लावला म्हणून देवाने त्याला ठार केले. उज्जा तत्क्षणी देवासमोर मरण पावला.

1Chronicles 13 illustration - 1Chronicles Chapter 13

11देवाने उज्जावर असा राग काढावा याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हा पासून आजतागायत त्या ठिकाणाचे नाव “पेरेस-उज्जा” असे आहे.

12दावीदाला त्यादिवशी देवाची धास्ती वाटली. दावीद म्हणाला, “आपल्या इथे मी परमेश्वराचा कोश कसा आणू?”

13त्यामुळे त्याने दावीदानगराला तो करारकोश आणला नाही. तेथेच त्याने करार कोश ओबेद-अदोम याच्या घरी नेला. ओबेद-अदोम हा गथ नगरातील होता.

14हा करारकोश त्याच्या घरात तीन माहिने होता. ओबेद-अदोमच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला परमेश्वराने आपले आशीर्वाद दिले.

Chapter Complete

You have read 1Chronicles 13

14 verses